Availability: In Stock

एक होता गंधर्व

SKU: MH22

0.00

Store
0 out of 5

एक होता गंधर्व

– निवेदन – 

“एक होता गँधर्व”ही आहे बालगंधर्वाची जीवनकथा. 

नागपूरचे डॉ. राम म्हैसाळकर यांनी लिहिलेली .

जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली.

मधमाशांच्या मधानं लदलदलेल्या पोळाप्रमाणं.

बालगंधर्वाच्या आयुष्यातले चढउतार शब्दबद्ध करणारी.

बालगंधर्वाचा आयुष्यपट उलगडून दाखविता दाखविता तत्कालीन कालपट उलगडून दाखविणारी.

या कालपटातला संगीताच्या क्षेत्रातला वैभवकाळ चित्रीत करणारी.

मराठी नाट्याच्या व संगीताच्या रसिकांना अनमोल खजिना उपलब्ध करून देणारी.

भीज पाऊस मनोहर आहे असं नुसतं म्हणायचं नसतं.

या भीजपावसात मनसोक्त भिजायचं असतं.

चला, येताय ना भिजायला.

रा. रं. बोराडे,  अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य साहित्य आणिसंस्कृती मंडळ 

दिनांक : २०-९-२००१

Digital Book

1000 in stock

  Ask a Question

Description

…भाषा, जातपात आणि देश ह्या सगळ्या भिंती ओलांडून कलावंत नवीन सृष्टि निर्माण करतो…माणुसकी आणि रसिकता ह्यांनी भरलेल्या ह्या नाट्यसृष्टीचे बाल गंधर्व सम्नाट आहेत. …बाल गंधर्व हे मराठी रंगभूमीच्या सुवर्ण युगाचे अग्रदुत आहेत. पुन्हा असा नट होणार नाही  – यशवंतराव चव्हाण

बालगंधर्व म्हणजे महाराष्ट्राचे संगीतछत्रपती!…बालगंधर्व बोलायचा विषय नाही.. ऐकायचांविषय आहे. शिवरायाचा आठवावा प्रताप-तसे बालगंधर्वांचे आठवावे स्वरुप. बालगंधर्वाचे आठवावे गायन! असेच म्हणावे लागेल. – आचार्य अत्रे


बालगंधर्व

बाल गंधर्वांचा मी ऋणी आहे. . -र्‍नाट्याचार्य खाडीलकर

मला चांगलं गाणं ऐकावसं वाटलं की मी बालगंधर्वांच्या नाटकाला जाऊन बसतो. –अलादियांखांसाहेब

माझे अन्नदाते, माय बाप हो, तुमच्या आशिर्वादाने मी जिवंत आहे. ह्या पेक्षा जास्त मी काय बोलणार? …देवा जवळ मला एकच मागणे मागायचे आहे. परमेश्वरा माझ्या रसिकांना उदंड आयुष्य दे!”

नारायणरावांचे हे शेवटचे भाषण! त्यात त्यांनी स्वतः साठी काही मागितले नाही परमेश्वराजवळ उदंड आयुष्य मागितले ते आपल्या ‘अन्नदाते मायबापांसाठी!!

मग प्रश्‍न पडतो, रसिकांनी बालगंधर्वावर अधिक प्रेम केलं की बालगंधर्वांनी त्यांच्या रसिकांवर…  कुणी कुणासाठी जीव ओवाळून टाकला!

Please follow and like us:
Pin Share

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एक होता गंधर्व”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.