Availability: In Stock

महर्षी धोंडो केशव कर्वे

SKU: MH21

0.00

Store
0 out of 5

अण्णासाहेबांना खंत होती, ती ही की स्वातंत्र्यानंतर समता आलेली नाही. समता आल्याशिवाय स्वातंत्र्याची खरी गोडी चाखता येणार नाही, असे ते म्हणत. महर्षी कर्वे यांनी कधीही तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा लोकांना कोणता उपदेश केला नाही. कर्वे यांचे कार्य हाच कर्वे यांचा संदेश होता. ‘आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण झाडापर्यंत तरी जाईल’ या वचनाप्रमाणे कर्वे कार्य करीत राहिले.

कर्वे यांच्या थोरवीबद्दळ आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘मी कोण आहे’ असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला आणि त्याचे वस्तुनिष्ठ उत्तर स्वतःच शोधून काढले. म्हणूनच ते म्हणतात-“मी समाजकार्याला सर्वस्वी वाहून घेतले नाही. संसारी माणूस व संन्यासी वा त्यागी माणूस या दोघांच्या मधला मार्ग मी स्वीकारला. मी संसार नेटका केला नाही. कसाबसा करीत राहिलो. अजूनही करीत आहे. कुटुंबासाठी घरदार किंवा द्रव्यसंचय मी केला नाही. जरुरीपुरतेच वैयक्तिक व कौटुंबिक स्वार्थाकडे लक्ष देऊन बाकीचे सामर्थ्य व उर्वरित द्रव्य लोकहिताच्या कामी खर्चणे हा माझा स्वभाव बनला आहे.”स्वतः विषयीची वस्तुनिष्ठ जाणीव व स्वतःचे यथार्थ मूल्यमापन थोड्याच लोकांना करता आले. महर्षी कर्वे यांनी असे मूल्यमापन स्वतः केले.

धर्म, नीतिशास्र आणि तत्त्वज्ञान यासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचे सर्व आचरण धर्माधारित होते. हा धर्म कोणता? सद्‌विचारधर्म. अण्णासाहेबांनी धर्मविचारात आणि कर्माचरणात कर्मकांडाळा कधीच स्थान दिले नाही. त्यांचा मानसिक पिंड एखाद्या संन्याशासारखा अविचल आणि निर्विकार होता. 

Book info

डॉ. न. म. जोशी
76

1000 in stock

  Ask a Question

Description

निवेदन

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अशा  व्यक्तींची साधारणत: शंभर ते सव्वा पानांची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती “महाराष्ट्रातील शिल्पकार”या चरित्रग्रंथमालेतील “महर्षी धोंडो केशव कर्वे”हा एकोणिसावा चरित्रग्रंथ आहे.

शेतातल्या पिकाची नीट वाढ होण्यासाठी वेळीच त्यातल्या तणाचं निर्मूलन करावयास हवं. तणाचं निर्मूलन करण्याचे दोन मार्ग आहेत. तणाचा प्रतिबंधक औषधाने फवारणी करणे हा एक मार्ग व खुरपणं करून ते तण काढून टाकणे हा दुसरा मार्ग. महर्षी धोंडो केडव कर्वे यांचं कार्य दुसऱ्या प्रकारचं आहे. समाजातल्या अनिष्ट रुढी नष्ट करण्यासाठी त्यांनी विचारांचा प्रहार करण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीचा अवलंब केला. त्या काळात विधवा विवाहाचा नुसता विचार करणे हे पाप मानलं जात होतं त्या काळात त्यांनी एका विधवा स्रीशी विवाह केला.

निराधार स्रियांना आधार देणे, शिक्षणाची दारं त्यांना खुली करणे हे महर्षी कर्वे यांनी आपलं जीवित कार्य मानलं. केवळ मानलं नाही तर या कार्याला त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत स्वतःला वाहून घेतलं.

प्रस्तुत ग्रंथाचे लेखक श्री. न. म. जोशी यांनी “अनाथबालिकाश्रम ते महिला विद्यापीठ असा कर्वे यांच्या स्वप्नांचा विस्तार झाला”असं त्यांचं सार्थ शब्दात वर्णनकेलं आहे. महर्षी कर्वे यांनी समता संघ, जातिनिर्मूलन संस्था, ग्रामश्रिक्षण मंडळ इत्यादी संस्थांची कामे उभी केली असली तर त्यांची खरी ओळख स्रियांच्या संदर्भातील केलेल्या कामामुळे होते.

महर्षी कर्वे यांनी केलेल्या समाजकार्याचा विशेष असा की, त्यांनी आपल्या संसाराकडे पाठ फिरवून हे समाजकार्य केलेले नाही तर आपला संसार नीटनेटका करीत हे समाजकार्य केले.

हे समाजकार्य करण्याची महर्षी कर्वे यांची पद्धत कशी होती याचं अतिशय समर्पक वर्णन श्री. न. म. जोशी यांनी या ग्रंथात केलेलं आहे.

प्रवाहाच्याविरुद्ध पोहताना शक्‍य तो प्रवाहाशी जमवून घेऊन आणि प्रवाहात काही भोवरे व डोह असतील तर ते टाळून अण्णासाहेबांनी आपल्या समाजसुधारणेची नौका पैलतीराला नेण्याचा नेहमीच प्रयत्न केला. याबाबत त्यांची स्वतःची इच्छाझक्ती, दुर्दम्य आकांक्षा, कमालीची सहनशीलता आणि शांतपणे कार्य करण्यासाठी लागणारी स्थिरबुद्धी यांचा त्यांना नेहमीच उपयोग झाला. आक्रमक नसूनही सक्रिय व सफल समाजसुधारक होता येते याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

हे उदाहरण महर्षी कर्वे यांच्यापुरतचं मर्यादेत राहावे यातच त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे.

रा. रं. बोराडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

दिनांक : ४ डिसेंबर, २००३ 

Please follow and like us:
Pin Share

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महर्षी धोंडो केशव कर्वे”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.