Availability: In Stock

महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग

SKU: mh10

0.00

Store
0 out of 5

महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग  

श्रीमज्ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला मराठी भाषेचा पोशाख चढवून स्वतःबरोबरच भाविक प्राकृत जनांस अमृतानुभवाची वाट दाखवून समाधि घेतल्यावर लवकरच महाराष्ट्रसाम्राज्य लयास गेलें. परंतु बाह्यतः जरी हा मोठा फरक झाली तरी ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रीयांच्या विचारस्वातंत्र्यास जें शुद्ध, सात्त्विक आणि ठळक वळण लावून दिलें तें कायमच झालें. ज्ञानेश्वरांचा समकालीन परंतु त्यांच्या मागें अर्धशतकावर जगलेला असा जो नामदेव, त्याला परधर्मी राजाचा काच सोसावा लागलाच. तात्पर्य काय, नामदेवापासून तों तहत तुकाराम-रामदासांपर्यंत अडीच-तीनशें वर्षांत पुढें होणाऱ्या यच्चयावत्‌ साधुसंतांस व त्यांच्या अनुयायांस आणि त्यांच्या समकालीन सर्व स्वधर्मनिष्ठ मराठ्यांस परधर्मी राजांचा आणि राजपुरुषांचा छळ सोसावा लागला. त्या सर्वांनी तो आपापल्यापरी ईश्वरावर श्रद्धा ठेवून सोसलाही; परंतु आपणांस हा सोसावा लागत असणारा जाच अन्नाय्य आहे; हे परकी लोक आपल्या देशांत केवळ शिरजोरपणाने घुसले आहेत; त्यांचा धर्म त्यांना जितका प्रिय आहे तितकाच आपला धर्म आपणांलाही प्रिय असला पाहिजे; ते जसे, ‘ईश्वराचे आपण लाडके भक्त असें मानितात; तसेच आपण मराठे लोकही ईश्वराचीं लाडकीं लेंकरेंच आहोंत; असें समजण्यास काय हरकत आहे? 

ईश्वर न्यायी आहे; तो सर्वांवर सारखी दया करणारा आहे. त्याच्यापुढें हा मराठा, हा मुसलमान; पहिला नावडता, दुसरा आवडता असला भेद नाहीं. मात्र जो जसें कर्तव्य बजावील, जो जसा आपल्या धर्मास, आपल्या जन्मभूमीस, आपल्या देशबांधवांस ऐक्यानें भजेल, तसा तो, त्याची जन्मभू, त्याचे देशबांधव परस्परांस सुखप्रद होतील, व त्या सर्वांची एकतानता होऊन सर्वांचा सारखाच उद्धार होईल. त्यांच्यांतील परस्परमत्सरामुळें त्या सर्वांची झालेली, होत असलेली व पुढें होणारीही दैना दूर होईल आणि जगांतील इतर लोकांस व सदुदाहरण घालून देऊन वैभवाच्या शिखरावर सुखनिद्रा घेऊं शकतील. अजा प्रकारच्या सात्त्विक श्रद्धेनें, दैवी संपत्तीच्या लालसेनें, स्वदेश, स्वधर्म आणि सदाचार यांची उन्नति करणें, हेंच कर्तव्य समजून, सतत कायावाचामनें प्रयत्न करणारे महाराष्ट्रांतील आचांडाळब्राह्मण जातींतील सर्व सत्पुरुष कसे वागले आणि त्यांना व त्यांच्या स्वदेश, स्वधर्म आणि स्वजन या प्राणप्रिय त्रयीला परम श्रेयस्कर अशी उन्नति कशी प्राप्त झाली, हें दाखविण्याचा ह्या लेखाचा उद्देश आहे. म्हणजे श्रीमुकुंदज्ञानेश्वरांच्या परमामृत, अमृतानुभवानंतर दैवानें उलट खाल्यामुळे ‘न हिन्दुर्न यवनः’ असला प्रकार झाल्यावर श्रीसमर्थ रामदासांच्या दासबोधाची आवश्यकता कशी आली आणि तो बोध सार्थनाम कसा झाला हें दाखवावयाचें आहे.  

वरील उद्देश तडीस नेण्यास अवइ्य असणारी विद्ठत्ता लेखकाला नाहीं; तथापि ‘प्रयत्नीं परमेश्वर’ ह्या वृद्धवचनावर भरंवसा ठेवून तो चालणार आहे. श्रीज्ञानेश्वरमुकुंदराजप्रभृति साधुसंतांच्या लेखांचा, तसाच बखरी, कागदपत्रें आणि राजवाडेप्रभृती स्वेतिहासशोधकांनीं उघडकीस आणलेल्या विविध माहितीचा शक्‍य तितका उपयोग करून हा लेख सजविण्याचा विचार आहे.  

ह्यांत तेरावें चौदावें आणि पंधरावें ह्या तीन संबंध झ्तकांचा महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय असा तिन्ही बाजूंचा संक्षिप्त इतिहास येणार आहे. तरी वाचकांनीं सावधान राहून ग्राह्य घ्यावें, त्याज्य टाकावें आणि अक्षम्य चुका असतील त्या पदरांत घालून त्या सुधारण्याचा मार्ग त्याला दाखवावा आणि परस्परांची समजूत पटवून ऐक्य साधण्याचा संकल्प करावा, एवढी विनंति करून स्वीकृत कार्यास आरंभ करितों. 

Digital Book 

Book info

लेखक: नारायण कृष्ण गद्रे, संंपादक: गणेश हरी खरे
264

999 in stock

  Ask a Question

Description

या पुस्तकावरचा पुढील अभिप्राय तत्कालीन म्हणून उद्धृत करणे अत्यवश्य आहे… 

ह्या महाराष्ट्रमहोदयाच्या पूर्वरंगांत साडेतीनशे  वर्षांचा धार्मिक, राजकीय व सामाजिक इतिहास रा. गद्रे यांनीं बखरी, कागदपत्रे व शोधकांचे लेख इत्यादि सामुग्रीच्या आधारानें लिहिला आहे. रा. रा. नारायणराव गद्रे हे एक कसलेले लेखक असून, प्रस्तुत पुस्तकांतील माहिती संगतवार, भाषा प्रौढ, विवेचन मार्मिक व स्पष्ट असून, विषयाची मांडणी व्यवस्थिस असल्यामुळें हें पुस्तक बहुश्रुत मराठी वाचकांच्या आदरास पात्र होईल असा आम्हांस भरंवसा वाटतो. सामान्य वाचकांसहि हें पुस्तक वाचून ऐतिहासिक कादंबरीप्रमाणें मनोरंजन व बोध यांचा लाभ झाल्यावांचून राहणार नाही. [केसरी, तारीख ६-२-१९०६] 

विजयानगरच्या इतिहासाकडे महाराष्ट्राच्या दृष्टीनें पाहण्याचा एकअभिनव प्रयत्न कै. ना. कृ. गद्रे यांनीं एका ग्रंथांत केला आहे. त्यांच्या ग्रंथाच्या नांवावरूनच त्यांच्या विचारांची दिशा कळून येण्याजोगी आहे. ‘महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग’ हें नांवच सांगतें की, महाराष्ट्रांत जी स्वराज्यस्थापना झाली तिच्या उदयाची पार्श्वभूमि चित्रित करणें हा रा. गद्रे यांचा उद्देश आहे. विजयानगरचें अस्तंगत साम्राज्य आणि महाराष्ट्रांतील स्वराज्याचा उदय हीं दोन्हीहि अदृश्य कार्यकारणभावानें निगडित असल्याचें प्रतिपादन रा. गद्रे यांनी केलें आहे, तें सर्वथा समर्थनीय नसलें तरी तसेंच तें सर्वथा उपेक्षणीयहि नाहीं.” [वि. पां. नेने संपादित अर्वाचीन मराठी साहित्य : द. वा. पोतदार : मराठी इतिहास व इतिहाससंशोधन, पा. ३६८] 

पंढरपुरातील विठ्ठल मुर्ती आणि इतिहास 

पंढरपुराहून विठ्ठलाची मुर्ती विजयनगरला नेली असता भानुदासांनी परत आणली या भानुदासासंबंधी टीपेंत श्रीविठ्ठलाची मूर्ती भानुदासांनी अनागोंदीहून आणिली इत्यादि वृत्तांतास प्रत्यंतर पुरावा नाहीं, म्हटलें आहे. परंतु त्यास रा. वि. का. राजवाडे ह्यांनीं ग्रंथमालेंत छापलेल्या चौऱ्यायशीच्या शिलालेखांत खालीलप्रमाणें पुरावा सापडतो. यवनांनीं ह्या देवळाचा व आंतील मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला; तेव्हां अनागोंदी येथील तत्कालीन राजानें विठोबाची मूर्ती हंपीस नेली व तिची स्थापना त्या शहरी केली, अज्ली एक लोकवार्ता आहे. ही लोकवार्ता खरी आहे असें हंपी येथील  शिलालेखावरून दिसून येतें. 

ह्यावरून असें दिसतें कीं, शक १४३५ श्रीमुखनाम संवत्सराच्या पूर्वी दोन वर्षे पंढरपुराहून विठोबाजी मूर्ती विजयनगरच्या कृष्णदेवानें आणून हंपीस स्थापन केली. त्या वेळीं एकनाथाचा पणजा भानुदास चांगला वयांत आलेला असावा. पुढें यवनांची क्रूरदृष्टी किंचित कमी झाल्यावर भानुदासनें हंपीहून ती मूर्ती परत आणिली असावी. कर्नाटकांतील इतर मोठमोठ्या क्षेत्रांतून विठोबाची देवळें फारच विरळा आढळतात. प्रख्यात असें विठोबाचें देऊळ हंपीसच तेवढें एक आहे. तें कृष्णदेवानें क १४३५ त बांधून त्याच्या अर्चेची व उत्सवाची व्यवस्था लावून दिली.

Please follow and like us:
Pin Share

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.