Availability: In Stock

मुलखावेगळा राजा (औंधाचा राजा)

SKU: mh2

0.00

Store
0 out of 5

लेखकाचे काहीतरी

मुलखावेगळा राजा ही गोष्ट आहे औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं यांची. इतिहास नाही, पण सत्य गोष्ट आहे. भावनेत, स्मृतींत, जशी नोंद झाली आहे तज्ञीच सांगितली आहे.

व्यक्ती सर्वच्या सर्व खऱया आहेत, काल्पनिक नाहीत, त्यांच्यासंबधीचा काही मजकूर त्यांना आवडणार नाही, कदाचित बोचेलसुद्धा. त्याबद्दल अगदी सपशेल, बिनशर्त दिलगिरी. कोणाला दुखविण्याचा, डिवचण्याचा हेतू नाही.

सर्व संवाद भावना-स्मृतीत आहेत तसे, थोड्याफार फेरफाराने घातले आहेत. हे संवाद ध्वनिफितीवर नोंदले वा कागदावर टिपले नव्हते. पण त्यामागील भावना, हेतू सत्य आहे.

साल, महिना, तारीख कदाचित काही ठिकाणी चुकली असणार. त्याबद्दल क्षमायाचना.

श्री. रवींद्र कुलकर्णी यदुनाथ थत्तेंना घेऊन आले नसते तर ही गोष्ट कागदांवर आली नसती.

गोष्ट लिहिताना जो आनंद वाटला त्याबद्दल त्या दोघांना धन्यवाद.

आप्पा पंत – (पंत निवास : बंगलोर-लोणावळा)

“पंत निवास”, भांडारकर रोड, पुणे ४११००४

औंधाचा-राजा-भवानराव

Digital Book

Book info

आप्पा पंत
164

996 in stock (can be backordered)

  Ask a Question

Description

“आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार” मालेसंबंधी दोन शब्द 

इसवी सन १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाला; आणि १९४७ मध्ये इंग्रज हिंदुस्थानातून गेले. नागपूरकर भोसल्यांचे राज्य १८५४-५५ ला इंग्रजांच्या पूर्णपणे ताब्यात आले. वऱ्हाड हा आधीचा निजामाचा मुलूख तो इंग्रजांच्या ताब्यात १९०२ मध्ये आला. मराठवाडा तर भारतातून इंग्रज गेल्यावर पोलिस कारवाईनंतर. या चार घटकांपैकी नागपूर आणि वऱ्हाड हे दोन घटक मध्यप्रदेशात आणि मराठवाडा हैदराबाद संस्थानात. १९६० मध्ये हे सर्व घटक एकत्र आले आणि त्यांचे महाराष्ट्र राज्य बनले. 

आधुनिक महाराष्ट्राच्या पुनर्जागरणाचे व उभारणीचे प्रयत्न १८१८ नंतर ताबडतोब सुरू झाले.  पश्चिम महाराष्ट्रात या जागरणाची सुरुवात झाली. त्याचे लोण हळूहळू इतरत्र पसरले. महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अशा सर्व क्षेत्रात महनीय कामगिरी करणारे धुरीण झाले. महाराष्ट्राच्या शिल्पकारांची न संपणारी एक यादी आहे. “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार” असे सतत जन्माला येणारे आहेत; त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती प्रतिच्ंद्रलेखेव विकसित होत जाणार आहे.

या सर्व श्रिल्पकारांची ओळख आजच्या आणि भावी पिढीस व्हावयास पाहिजे. हे सर्वच काम अंगावर घेणे सोपे नाही. तरीही यांपैकी काहींची ओळख करून दिल्यास या कार्याचा शुभारंभ तरी होईल. महाराष्ट्र शासनाने आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांची ओळख करून देण्याची एक योजना आखली आणि ती साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या हवाली केली. त्यातून कमीत कमी शंभर तरी चरित्रे पुढील पाच-सात वर्षात प्रकाशित व्हावी, अशी अपेक्षा आहे.

बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा परिचय करून देणारे “मुलखावेगळा राजा” हे पुस्तक हे यापैकीच एक. “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार” या मालेतील सहावे पुष्प. लवकरच मागील व पुढील काही पुष्पे प्रकाशित होतील अज्ञी आज्ञा करू या. ही पुष्पे प्रकाशित करताना कालानुक्रम पाळणे आम्हाला अभिप्रेत नाही. पुस्तके जसजज्ली तयार होत जातील, तिसतज्ञी ती प्रसिद्ध करण्याचा मंडळ प्रयत्न करील.

आमच्या या योजनेत सहभागी झाल्याबद्दल “मानसन्मान प्रकाशन” चे श्री. रवींद्र कुलकणी यांनाही धन्यवाद. ऄसेच सहकार्य महाराष्ट्रातील अन्य प्रकाशकांनी दिल्यास ही योजना लवकर फलद्रूप होउ शकेल.

सुरेंद्र बारलिंगे

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

मंत्रालय, मुंंबई ४०००३२

किर्लोस्कर औंध संस्थानात

गांधीवादी ग्रामराज्याच्या प्रयोगाची सुरुवात जशी औंध संस्थानात झाली तशीच किर्लोस्करांसारख्या प्रचंड उद्योगसमूहाची, भांडवलशाहीची पायाभरणीही औंधमध्येच झाली. आप्पासाहेब लिहितात, “श्री. लक्ष्मणराव किर्लोस्कर राजाचे जिवलग दोस्तच होते. जवळ जवळ समवयाचेच. किर्लोस्कर बंधू त्या वेळी बेळगावात होते. सायकल रिपेअरिंगचा उद्योग होता. तेथेच लक्ष्मणराव नांगराचे फाळ तयार करू लागले. साहेबाला कोणी सांगितले की, जिथे फाळ ओतले जाऊ शकतात, तिथे बाँबही होईल. कडक पाळत ठेवा……त्याच वेळी बापूंनी भवानरावांना सुचविले की, लखूमामांना औंधला बोलवा. तिथे आपण जागा घेऊ. इतर त्रास होणार नाही.” “झटपट निश्चय झाला, १९१० साली कुंडलच्या माळावर कारखाना सुरू झाला. पुढे सर्व जगविख्यात किर्लोस्कर उद्योगाचा वृक्ष फोफावला.”

औंधमधे भूमिगत ग्रामराज्याचा, गांधीवादी घटना राबविण्याचा प्रयोग झाला हे एक ऐतिहासिक सत्य आणि किर्लोस्करसारख्या प्रचंड उद्योगसमूहाचा जन्मही तेथेच झाला, हे दुसरे ऐतिहासिक सत्य. या दोन्ही घटना औंधमध्ये जन्मास याव्या असा काही कार्यकारण संबंध आहे काय असा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. याचे एक उत्तर नाही असेच आहे. परंतु गांधीवादी घटना राबविण्याची इच्छा आणि उद्योगधंद्याला मदत करण्याची इच्छा उद्योगधंदे वाढवावे अशी इच्छा ही औंधकरांना होती, हे तर खरे आहेच. त्यामुळेच उद्योगसमूह कसा जन्मतो व कसा वाढतो याचा अधिक खोलात जाऊन विचार करावा लागेल. 

उद्योगसमूह हा मोठा असो किंवा लहान, त्याला एक आश्रय लागतो. हा आश्रय पैज्ञाचा असतो, मोकळ्या हवेचा असतो, संधी मिळण्याचा असतो आणि विकासाला लागणार्‍या स्वातंत्र्याचा असतो. अशा प्रकारचा आश्रय पुढे फार मोठ्या झालेल्या उद्योगाला औंधकरांकडून मिळाला. त्या काळात किंवा आज सुद्धा राष्ट्रीय वृत्तीच्या माणसासमोर भांडवलवादाच्या प्रश्नापेक्षा स्वदेशीचा प्रश्‍न अग्रक्रमाने उभा असतो. “नॅशनल बुर्झवायजी” ची संकल्पना ही याच विचारातून उत्पन्न झाली आहे. 

व्यक्तिस्वातंत्र्य जसे लोकशाहीला आवश्‍यक असते, तसेच ते भांडवलशाहीला पण आवश्‍यक असते. या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेमुळेच सर्वांना समान संधी मिळते. पण एखादाच उद्योजक त्या संधीचा उपयोग करू शकतो. समाजवादी नेते जरी सर्वांना समान संधी पाहिजे असे म्हणत असले आणि व्यक्तीच्या विकासाकरिता संधी उपलब्ध होणे जरी आवश्‍यक असले तरी समान संधीचा फायदा सर्वानाच मिळत नसतो आणि शेवटी व्यक्तिस्वातंत्र्यामुळे समान संधीचा परिणाम हा असमानतेत किंवा विषमतेतच होतो. संधी समान असली तरी माणसाचा अहंपणा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्या अहंपणाची ऊक्ती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्या झक्तीतून उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीचा मागोवा किंवा भोग घेण्याची शक्ती ही वेगवेगळ्या प्रकारची असते.  आणि या ठिकाणी माणसाचे कर्तृत्व, त्याची बुद्धी, त्याचा निर्णय घेण्याची शक्ती या गोष्टी कामाला येतात. 

वैवस्वत मनूची कथा आहे. हा सूर्यवंश्यातील राजा नदीच्या काठी संध्या करीत होता. त्याने ओंजळीत पाणी घेतले आणि तो सूर्याला अर्घ्य सोडणार इतक्यात त्याला दिसले की, आपल्या ओंजळीत एक इटुकला मासा आला आहे. औंधकरांच्या ओजळीतही असाच इटुकला मासा आला होता. बेळगावात सायकलदुरुस्तीचे दुकान चालविणारा हा ‘इटुकला मासा’ औंधकरांच्या ओंजळीत काही काळ तरी सुरक्षित राहू शकला. त्याला श्वास घेण्यास मोकळी हवा मिळू शकली. मूळच्या सायकलच्या दुरुस्तीच्या दुकानाचे परिवर्तन नांगराचे फाळ करण्याच्या लहानशा कारखान्यात झाले. असा कारखाना, असा उद्योगधंदा देश्याच्या प्रगतीला पूरक आहे, असा सर्वसामान्य सद्गुणी विचार मोकळ्या बुद्धीच्या औंधकरांच्या मनात निश्चितच होता. हे स्वदेशीला उत्तेजन देणे होते. नांगराचे फाळ बनविणारा कारखाना बॉम्बची कवचेही बनवू शकतो हा देशभक्तिपर विचारही एखाद्या बुद्धिमान माणसाच्या मनात येऊ शकतो. 

सुरुवातीच्या काळात या नांगराच्या फाळाकरिता बाजारपेठ जवळपास उपलब्ध नव्हती. पण वऱ्हाडातील कापसाची शोती तेव्हा तेजीत असल्यामुळे हा कारखाना सुरक्षित राहिला. कदाचित त्या वेळी हा कारखाना मुंबई किंवा टाटानगर येथे निघाला असता तर तो नाहीसा तरी झाला असता किंवा दुसर्‍या मोठ्या उद्योगसमूहाचा एक उपकारखाना म्हणून तरी त्याचे स्थान राहिले असते. छोट्या कारखान्याची निर्मितिप्रक्रिया व विकास पूर्ण झाल्यावर हा कारखाना केवळ औंधच्या परिसरात राहिला नाही. तो हळूहळू सोलापूर, हरिहर, पुणे इत्यादी ठिकाणी गेला. एका कारखान्याचे अनेक कारखाने झाले. या ठिकाणीसुद्धा हा उद्योगसमूह अजून लहानच होता. वैवस्वत राजाच्या ओंजळीतील मासा प्रथम कमंडलूत, नंतर विहिरीत, नंतर तलावात, नंतर नदीत, आणि नंतर समुद्रात सोडावा लागला. आणि तो समुद्रात जेव्हा सोडला गेला तेव्हा तो मासा जगाला वाचविणार किंवा जगात प्रलय घडवून आणण्याची शक्ती असणारा ईश्वराचा पहिला अवतार म्हणून प्रसिद्ध झाला. औंधकरांनी अभय दिलेल्या या माश्याला  सुद्धा पश्चिम जर्मनीपर्यंत अशीच प्रगती करता आली. निरनिराळ्या क्षेत्रांत, साहित्य क्षेत्रातसुद्धा, या माशाने नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि लोकप्रियता मिळविली.

Please follow and like us:
Pin Share

Additional information

Dimensions 1 × 1 × 1 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुलखावेगळा राजा (औंधाचा राजा)”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.