पुस्तकवाले

लेखक घर बांधतो

ख्यातनाम कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी पुण्यात आपल्या मनाप्रमाणे बांधलेल्या ‘अक्षर’ या वास्तूचे अतिशय हृद्य वर्णन त्यांच्या ‘लेखक घर बांधतो’ या लेखात केले आहे.

हे घर साहित्य-कला-संस्कृतीच्या असंख्य मैफलींनी नेहमी निनादत राहिले. आज काळाच्या तकाज्याने लेखकाचे हे घर अस्तंगत होते आहे.  बासष्ट साली घर पुरं झालं. खर्च बावन्न हजार झाला. घराला नाव पाहिजे. मी ते ‘अ क्ष र’ ठेवलं. अक्षरावर घर झालं होतं.

तेव्हा आसपास इमारतींची गर्दी झालेली नव्हती. बरंच रान मोकळं होतं. त्या पाश्र्वभूमीवर माधवरावांनी तयार केलेलं घराचं डिझाइन टुमदार आणि वेगळं दिसे. घर म्हणून त्याचं त्याला खास व्यक्तिमत्त्व होतं. केवळ आडवे उघडे वासे, मध्येच दिसणारा छपराचा भाग

घरातही थोडं ऊन, वारा, पाऊस आला पाहिजे; बाहेरच्या वातावरणापासून आपण एखाद्या बंद पेटीत राहिल्यासारखं राहू नये, म्हणून अंगणवजा हा भाग उघडा होता. माधवरावांचं सांगणं होतं की, या Perforations ची खालच्या भिंतीवर चांगली छाया पडेल.’

सत्तर साली एन. एस. डी.चे अल्काझी एकवार घरी आले होते. ते म्हणाले, ‘‘मराठी लेखकाचं इतकं सुंदर घर मी पहिल्यांदाच पाहतोय.’’

laurie-baker

लॉरी बेकर हा ‘ब्रिटिश’ मनुष्य ‘भारतीयाहून भारतीय’ होता !’

‘अल्पखर्ची व पर्यावरणसंवादी (लो कॉस्ट अॅन्ड इको-फ्रेन्डली) घर’, या संकल्पनेचे प्रवर्तक मानले जाणारे वास्तुविशारद लॉरी बेकर यांचे 1 एप्रिल 2007 रोजी वयाच्या 90व्या वर्षी तिरुवनंतपुरम येथे निधन झाले. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर व सुधाताई गोवारीकर यांचा लॉरी बेकर यांच्याशी परिचय झाला, स्नेह जडला. त्याच काळात गोवारीकरांचे तिरुवनंतपुरम येथील घरही लॉरी बेकर यांनी बांधून दिले. म्हणून सुधाताई व वसंतराव गोवारीकरांना आम्ही विनंती केली लॉरी बेकर यांच्याविषयीच्या आठवणी सांगण्याची; त्यातून तयार झालेला हा लेख, खास ‘साधना’च्या वाचकांसाठी…

वसंत व सुधा गोवारीकर

https://weeklysadhana.in/view_article/article-on-laurie-baker-by-vasant-and-sudha-gowarikar

भवानराव पंतप्रतिनिधी

औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं

ही गोष्ट आहे एका राजाची. राजेपण कधीच न मिरवलेल्या सच्च्या गांधीवादी माणसाची. राजा असला तरी तो प्रजेमध्ये मिसळून गेलेला असा माणूस महाराष्ट्रात होऊन गेला हे आता कदाचित पटणार नाही.

औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींनी संस्थानात लोकशाही कशी आणली, हे ही जाणुन घेऊ! 

ओंकार करंबेळकर, बीबीसी मराठी प्रतिनिधी

15 सप्टेंबर 2020 / 26 नोव्हेंबर 2021

नरहर कुरुंदकर कोण होते आणि त्यांचे विचार आजही लागू होतात का?

नरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ – १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदापूर (जि. हिंगोली ) गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव.

त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्यपद भूषविले होते.विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.

नरहर कुरुंदकर म्हटलं की, त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

– तुषार कुलकर्णी ( बीबीसी मराठी)

15 जुलै 2020

पुनर्लेखन  15 जुलै 2023

गोष्टीवेल्हाळ! – द. मा. मिरासदार

कथा हा साहित्यप्रकार अतिशय तरलपणे हाताळणाऱ्या त्या काळातील नवकथेहून निराळा बाज घेऊन दमा साहित्यविश्वात अवतरले. त्यांच्या चित्रमय शैलीने वाचणारा नुसता गालातल्या गालात स्मित करीत नाही, तर खळखळून हसतो. जणू काही ती घटना आपल्या समोरच घडते आहे, असा सुखद भास व्हावा, अशी त्यांची कथा. वाचनाएवढेच त्यांच्या कथा त्यांच्या मुखातून ऐकणे अधिक बहर आणणारे. उत्तम वक्ता असणे वेगळे आणि कथा रंगवून सांगणे वेगळे. मिरासदारांकडे हे दोन्ही गुण होते. त्यांची कथा ऐकणे म्हणजे शब्दांतून रंगणारा चित्रपट. त्यातील पात्रे, त्यांचे संवाद, घटना, त्यातील फजिती, त्याने येणारे कसनुसेपण हे सारे त्यांच्या कथाकथनात अशा बाजाने येत असे, की श्रोता हसून हसून दमून जाई. मिरासदार, पाटील आणि माडगूळकर या लेखकत्रयीने महाराष्ट्राला त्याची खरीखुरी ओळख करून दिली. शहरी लेखकांच्या कथा वाचणाऱ्या वाचकांनाही मिरासदारांनी अतिशय अलगदपणे आपल्या तंबूत आणून ठेवले. केवळ विनोद एवढय़ाच भांडवलावर ते शक्य नव्हतेच. माणसे वाचत असताना, त्यांच्या भोवतालचा परिसर, त्यांच्या लकबी, त्यांच्यातील पापभीरूपणा, टागरटपणा, इरसालपणा, बेरकीपणा, वाह्य़ातपणा, सौजन्य आणि औद्धत्य या सगळ्या गुणांचा दमा आपल्या कथांमधून सहजपणे परिचय करून देतात. त्यामुळे त्या कथांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

RSS
Follow by Email
Shopping cart close