एम टी आयवा मारू

“एम टी आयवा मारू” विषयी काही – मकरंद जोशी

मोकाट सागरावरून ओसाड किनाऱ्यावर भणभणत येणा:या समुद्रवाऱ्याप्रमाणे मराठी साहित्यविश्वात ‘एम. टी.आयवा मारू’चं आगमन झालं ते वर्ष होतं 1989. मराठी साहित्यासाठी त्या कादंबरीचं नाव जेवढं अनवट होतं, तेवढीच त्या कादंबरीची बिनठशाची भाषा, बिनधास्त निवेदन आणि पूर्णपणे अनोळखी अनुभवविश्व. पंचवीस वर्षापूर्वी ते सगळंच एवढं धक्कादायक होतं की, असंख्य बिनधास्त रसिकांनी ती कादंबरी अक्षरश: डोक्यावर घेतली. ‘एम.टी.आयवा मारू’वर कौतुकाची-पुरस्कारांची उधळण केली. दशकातल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांत तिची निवड झाली. नावासकट तिच्या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न नवी पिढी करू लागली. पण त्या भणभणत्या समुद्रवाऱ्याच्या धक्क्याने जे भेलकांडले त्यांनी गेल्या पंचवीस वर्षात आयवा मारूला अनुल्लेखाने नाकारण्याचा सुरू केलेला प्रयत्न अजूनही सुरूच आहे; मात्र मराठीत प्रकाशित झाल्यानंतर तब्बल पंचवीस वर्षानी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘पेंग्वीन प्रकाशन’इंग्रजीत प्रकाशित करत आहे.

इंग्रजीत सागरी विश्वावर भाष्य करणाऱ्या शेकडो कादंबऱ्या असताना आयवा मारूमध्ये पेंग्वीनला वेगळं असं काय सापडलं जे अजूनही इंग्रजी साहि

गाभ्रीचा पाऊस आणि वळूचे निर्माते प्रशांत पेठे. शाळेत असताना जहाजावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षकांनी त्यांना ‘एम. टी. आयवा मारू’ वाचायला दिली आणि ती वाचून त्यांचा जहाजावर जाण्याचा निर्णय पक्का झाला. आज डायनॅमिक पोङिाशनिंग ऑफिसर असलेल्या पेठेंनी ‘आयवा मारू’चे भाषांतर करून पाठवलेल्या पहिल्याच खर्ड्यावर भाळून पेंग्वीनने ‘आयवा मारू’ स्वीकारली, तेव्हा पेंग्वीनच्या निवड प्रमुखाला मेलव्हीलच्या ‘मोबी डीक’ची आठवण झाली होती. प्रत्येक संभाषणात पेंग्वीनच्या प्रत्येक एडिटरने ‘आयवा मारू’ची तोंड भरून स्तुती केली.

– मराठीतलं हे जहाज इंग्रजी समुद्रात लोटायला पेंग्वीन अतिशय उत्सुक आहे, ते कशामुळे ?

दुर्दैवाने मराठी साहित्यविश्वाचा परिघच फार लहान आहे. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांतही जेमतेम अर्धा डझन विक्री केंद्रे, नाव घ्याव्यात अशा डझनभर प्रकाशन संस्था, डझनभर समीक्षक आणि अक्षरश: शेकडो पुरस्कार आहेत. हे पुरस्कार काही मोजके समीक्षक, प्रकाशन संस्था आणि काही ज्येष्ठ साहित्यिकांच्या वळचणीला बांधलेले. आजच्या मराठी कथा-कादंबऱ्यांचं हे संकुचित, आपापला परीघ न ओलांडता परीघाचेच सोहळे करण्यास सरावलेलं रूप हे आजच्या समीक्षा-पुरस्कार-प्रकाशन संस्था आणि प्रसिद्धी माध्यमांच्या तपश्चर्येचं फलित आहे.

इतिहासाशी, चारित्र्यपुरुषाशी, संत साहित्याशी, जातीय वादाशी संबंधित नसूनही, समीक्षेने गाजावाजा न करताही पंचवीस वर्षे अधिकाधिक वाचक लाभणाऱ्या ‘आयवा मारू’चं रहस्य काय याचा विचार करताना ठळकपणो जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे या कादंबरीचा लेखक अनंत सामंत. मराठी अकरावी करून 1968 साली हॉटेल मॅनेजमेण्ट करायला गेला. ते संपवून हॉटेलात नोकरी करण्याऐवजी याने विश्वभ्रमंती साधण्यासाठी जहाजावर नोकरी धरली. त्यातली भरभराट सोडून मध्येच एक दिवस हा डोंगरमाथ्यावर हॉटेल काढण्यासाठी स्वदेशी परतला. सरकारी लाल फितीच्या गळफासात अडकला. आणि मग मनातला वणवा शमवण्यासाठी याने उरातला समुद्र कागदावर उतरवला. ऊर हलका झाल्यावर हस्तिलिखिताचा गठ्ठा कायमसाठी कपाटात टाकला. तो तीन-चार वर्षानी याच्या आतेभावाच्या हाती लागला. भावाने प्रकाशनाचा हट्ट धरला. तोच ते बाड घेऊन गेला. तीन-चार प्रकाशकांकडून ते साभार परत आल्यावर मॅजेस्टिकच्या हाती आलं. प्रसिद्ध झालं.

या निर्मितीचं वैशिष्ठ हे की, या लेखकाने कधी विद्यापीठाचं तोंडही पाहिलं नव्हतं. त्याला साहित्याचा गंध नव्हता. समीक्षक-प्रकाशक, वगैरेंचं अस्तित्वही त्याला ठाऊक नव्हतं. प्रकाशित करणं सोडाच, कधी कोणाला हे हस्तलिखित दाखवण्याचीही इच्छा नसल्याने त्याला वाचकाचा विचार करण्याचीही गरज नव्हती. आपण लिहितोय ती कादंबरी आहे याचं भान त्याला गवसलेलं नाही….?

एम टी आयवा मारू

 असण्याएवढी जाण त्याला नव्हती. त्या निर्मितीवर, शैलीवर कोणाचाही कसलाही प्रभाव नव्हता. असलाच तर आभाळाचा, समुद्राचा, पोलादी जहाजाचा, आणि सागरी जीवनाचा प्रभाव होता. जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी परत एकदा त्या जीवनात शिरण्याशिवाय त्याला पर्याय उरला नाही म्हणून त्याने स्वत:ला निवेदक म्हणून केंद्रस्थानी ठेवून स्वत:भोवती ओळखीच्या जगाच्या भ्रामक विश्वाचा कोष कथानकाच्या धाग्यांनी गुंडाळत इथल्या बरबटलेल्या जगापासून दडायला एक भ्रामक पसारा तयार केला. स्वत:चं वेगळं जग निर्माण केलं. तिचं नाव ‘एम.टी.आयवा मारू’.

‘आयवा मारू’ लिहिणारा अनंत सामंत समीक्षेच्याच नव्हे, तर जातिपातींच्या सापळ्याबाहेरील जगात जगल्यामुळे त्याने फक्त डोक्यात थैमान घालणाऱ्या घटितांचाच विचार केला. तो फक्त कथाविषय कागदावर उतरवत गेला. विषयाने स्वत:च स्वत:ची भाषा, शैली, आकृतिबंध निवडला. त्यामुळे कादंबरीच्या वाचकांना सहसृजनाच्या क्षणी आकृतिबंध, शैली, भाषा वगैरेचे अडसर दूर करण्याचे प्रयास न करता थेट कथाविश्वात समरसतेने मिसळून जाणं सहज शक्य झालं. प्रत्येकाच्या जीवनाला असतो तसा नियतीचाच आकृतिबंध, सागरी शैली आणि खलाशाची भाषा जर स्वीकारता आली; तरच या कादंबरीची समीक्षा करणं शक्य आहे. मेलव्हीलची ‘मोबी डिक’, हेमिंग्वेचं ‘ओल्ड मॅन अॅण्ड द सी’ आणि अनंत स सामंतांची ‘आयवा मारू’ यांच्यात असलेली ही साम्यस्थळं याआधीही अनेक जाणकारांनी अधोरेखित केली आहेत.

या तीनही कादंबऱ्यांत रेखाटलेल्या व्यक्तिरेखा, निसर्ग आणि अन्य घटकांचा सामान्यजनांना सापडणारा संघर्ष हा मुळात संघर्षच नाहीये. ते सहजीवन आहे. मानवजगत म्हणजे एक अश्वत्थ. काही मुळं, काही पारंब्या, काही पानं, फुलं, फळं.. सारं अविभक्त, अखंड. त्यांचा कसा असेल एकमेकांत संघर्ष? या कादंबरीतील उज्वला, जिचं परिवर्तन हाच या कादंबरीचा गाभा आहे असं काही जणांना वाटतं ती या अश्वत्थाच्या रेखाटनातील एक सूक्ष्म घटक आहे. फळाच्या अवस्थेवरून ज्याप्रमाणो वृक्षाच्या मुळांच्या अवस्थेची जाणीव होते, त्याप्रमाणो तिच्या वर्तनावरनं आणि पोषाखावरनं तिची नैतिकता ठरत नाही, तर ती तिच्या भोवतालच्या एकगठ्ठा मानवी कळपाची नैतिकता, संस्कृती आणि सद्विवेकबुद्धी प्रदर्शित करते. उज्वलासकट कादंबरीतील सर्व व्यक्तिरेखा सामावून घेत एक अखंड मानवी शरीर सामंतांनी निर्माण केलं आहे. हे लक्षात आल्यावर जाणवतो तो मानव आणि निसर्गाचा संघर्ष आणि मग जाणवतं की हेही सहजीवनच आहे. सूर्यगोलातून उडालेल्या एका ठिणगीचा सूर्याशी संघर्ष जेवढा अशक्य, तेवढाच मानव आणि निसर्गाचा संघर्ष अशक्य. मेलव्हीलच्या ‘मोबी डिक’मध्ये एकगठ्ठा मानवी कळप, एक जहाज, एक मासा, आणि निसर्ग यांचं संघर्षमय भासणारं सहजीवन आहे. हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अॅण्ड द सी’मध्ये एक कोळी, एक होडकं, एक मासा आणि निसर्गाचा एका बालिश मनाला मोहवणारा संघर्ष आणि वृद्ध कोळ्याला मोहवणारं सहजीवन आहे.

सामंतांच्या ‘आयवा मारू’त जगाच्या कानाकोपऱ्यातून जमलेला एकगठ्ठा मानवी कळप, एक जहाज आणि निसर्ग यांचा संघर्ष भासावा असं सहजीवन आहे. – वेगळं म्हणजे मेलव्हील आणि हेमिंग्वेला भासलेली दृश्य माशाची गरज सामंतांना पडली नाही. सामंतांच्या कादंबरीत माशाची जागा स्वप्नांनी घेतलीय.

भारतीय अध्यात्मातील वैश्विक एकात्मता या कादंबरीत अस्पष्ट, धूसरच जाणवत असली तरी तीच या कादंबरीचा गाभा झाल्यामुळे ही भारतीय कादंबरी सागरी जीवनावरील कुठल्याही इंग्रजी कादंबरीपेक्षा नि:संशय वेगळी ठरते. मराठीस पूर्णपणे अनोळखी असणारं अनुभवविश्व मराठीत रेखाटणाऱ्या कादंबरीबाबत Gracia marquez च्या शब्दांचा आधार घेत लिहिता येईल, ‘Anant Samant only responded to his way of life, the life of the Seaman – who is solely Indian’

मराठी ‘एम.टी.आयवा मारू’ इंग्रजीत जाण्याच्या निमित्ताने परत एकदा अनंत सामंतांसह अनेकांशी केलेल्या चर्चेतून जाणवलेलं हे काही नव्याने मांडावंसं वाटलं इतकंच!

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *