“एम टी आयवा मारू” विषयी काही – मकरंद जोशी
मोकाट सागरावरून ओसाड किनाऱ्यावर भणभणत येणा:या समुद्रवाऱ्याप्रमाणे मराठी साहित्यविश्वात ‘एम. टी.आयवा मारू’चं आगमन झालं ते वर्ष होतं 1989. मराठी साहित्यासाठी त्या कादंबरीचं नाव जेवढं अनवट होतं, तेवढीच त्या कादंबरीची बिनठशाची भाषा, बिनधास्त निवेदन आणि पूर्णपणे अनोळखी अनुभवविश्व. पंचवीस वर्षापूर्वी ते सगळंच एवढं धक्कादायक होतं की, असंख्य बिनधास्त रसिकांनी ती कादंबरी अक्षरश: डोक्यावर घेतली. ‘एम.टी.आयवा मारू’वर कौतुकाची-पुरस्कारांची उधळण केली. दशकातल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांत तिची निवड झाली.