EMF Shielding अर्थातच कवच कुंडले

आजमितीला सेल फोन(भ्रमणध्वनी) म्हणजे आवश्यकता कमी पण चैनीची वस्तू अधिक अशी स्थिती आहे.

अनधिकृत, अगदी अधिकृत मोबाईल टॉवर एक समस्या आहे. मोबाईल टॉवर ची रेडिओ frequency पॉवर (तरंग शक्ती) ची अधिकृत मर्यादा इतकी जास्त आहे जणू वाहनवेगाची कमाल मर्यादा ताशी १००० किलोमीटर ठेवणं!

भारतात अनधिकृत टॉवर विरोधात प्रशासकीय लढे द्यावे लागतात ते अतिशय वेळकाढू काम आहे त्यात दफ्तर दिरंगाईमुळे हे लढे वर्षानुवर्षे चालू राहतात. न्यायालयात आव्हान दिल्यास किती वेळ लागू शकतो ह्याचा अंदाज सुद्धा बांधता येत नाही.

टॉवर च्या लगतच्या परिसरात राहण्याऱ्या सर्वसामान्यांना मात्र ह्याचा दुष्परिणाम सहन करत करतच जगावे लागते, परिणामी अनेकदा ह्यातून उद्भवणाऱ्या दुर्धर आजारांना तोंड देता देता मनुष्य हतबल होऊन जातो.

अश्या वेळी लढा देतांना आपण आपल्यासाठी कवचकुंडले बनविणे हे जास्तीत जास्त श्रेयस्कर असते, हा मुद्दा लक्षात घेऊन खालील माहिती संकलित केलेली आहे…. एकूणच माहितीचे संकलन हे प्रसार प्रचार ह्यासाठी केलेलं आहे. सदर कवच (shielding) बनविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने काम करणे अपेक्षित आहे.

EMF रेडीएशन म्हणजे चराचर सृष्टी वर दुष्परिणाम करणारे आधुनिक निकोटिन असा उल्लेख केला जातो!

ह्यामुळे शेती आवश्यक मधमाश्यांची संख्या अतिशय वेगानं कमी झाल्याचं आढळून आलेलं आहे. गाई गुरे, पीकपाणी ह्यांच्यावर घातक परिणाम करणारे हे टॉवर शेतीला प्रचंड त्रासदायक ठरतात.

उपाय समजून घेताना EMF रेडीएशन  चा शारीरिक संबंध कसा जोडला जातो ते थोडक्यात पाहूया…

Melatonin नावाचे एक हार्मोन आपण निद्रिस्त असताना रात्रीच्या प्रहरात सूर्यास्तानंतरच (केवळ शांत झोपेत असताना) मेंदूद्वारे सुचना देववुन स्त्रवले जाते. Melatonin एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे जे रात्री निद्रावस्थेत शरीर स्वच्छ आणि डिटॉक्स (निर्विष) करते. EMF रेडीएशनमूळे मानवी मेंदू गोधळतो आणि त्याला रात्र झाल्याचे कळत नाही परिणामी हे हार्मोन बनविले जात नाही आणि मग त्यातून शारीरिक बिघाड चालू होतात. सातत्याने रात्रपाळी करणाऱ्या कामगारांना देखील ह्यामुळे त्रास होतो.

 Electric मोबाईल जॅमर : समज आणि अपसमज

अनेक अपसमजांपैकी एक  अपसमज म्हणजे Electric  मोबाईल जॅमर लावला कीं परिसर सुरक्षित!… प्रत्यक्षात मात्र ह्या जॅमर मधून मोबाईल लहरींपेक्षा अधिक शक्तीच्या विद्युत चुंबकीय लहरी निर्माण केल्या जातात आणि मोबाईल टॉवर कडून येणाऱ्या लहरी परतविल्या जातात…. म्हणजे परिसरात EMF लहरींची शक्ती वाढते, अर्थातच रोगापेक्षा इलाज भयंकर!

आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे passive मोबाईल जॅमर म्हणजेच EMF shield…अर्थातच फॅरेडे केज, कवच…..

फॅरेडे केज

इसवीसनाच्या१९६८ साली मायकल फॅरेडे ह्या शास्त्रज्ञाने ह्या कवचाचा शोध लावला. ह्या कवचाच्या योग्य वापरामूळे EMF विद्युत चुंबकीय लहरींचे  (प्रारण, रेडिएशन) अवरोधन होते. ह्याच्या आत पावसाळी विजेचा अन रेडिओ लहरी(fm, mm आणि short wave) चा सुद्धा प्रवेश रोखला जातो.  ह्याच तंत्राचा वापर करून EMF shield तरंगकवच बनविण्यात येते.

कवच बनविण्यासाठी वेगवेगळ्या जाडीचे, सच्छिद्र किंवा सलग असे पत्रे वापरले जातात. तरंग लहरी च्या तीव्रतेनुसार ह्यां पत्र्याची मापके बदलली जातात. तरंग कवचासाठी विविध धातू वापरले जातात, जसे की तांबे, कांस्य, निकेल, चांदी, कथिल, अल्युमिनियम आणि स्टील. काही वेळी धातूच्या  मिश्रणाचा वापर केला जातो. धातूंच्या योग्य प्रमाणानुसार कवचाची गुणवत्ता ठरते. धातूंचे गुणधर्म जसे की विद्युत वाहकता, तन्यता, घनता, वजन आणि योग्य आकाराची छिद्रे इ. नुसार लहरी शोषून घेण्याची अचूकता वाढत जाते.

ह्या लहरी शोषून घेऊन  Earthing करणेच अपेक्षित असते. तरंगलहरींचे  परावर्तन हे परावर्तित क्षेत्रात धोक्याची पातळी अतिशय वाढविते आणि परावर्तित क्षेत्रातील एकूणच सजीवांना ते अतिरिक्त घातक ठरू शकते. जसे की मुंग्यापासून, पक्षी, झाडे, माणसे सगळेच..

तरंग लहरी शोषून घेण्यासाठी जाळी किती लहान असावी हे तरंग लांबी वर ठरते ( केवळ माहिती म्हणून सध्याचा 4gसाठी 50×50 ही किमान जाळी अपेक्षित असते)

काही निरिक्षणे

रोजच्या वापरातील TV ची डिश अँटेना पासून येणारी cable (तार) किंवा आता येणारी इंटरनेट जोडणीची तार उघडून बघितल्यास आतमध्ये आपल्याला  shield (कवच) आढळून येईल.

एक चिकित्सक वाचक किंवा अभ्यासक म्हणून आम्ही microwave ओव्हन चा वापर टाळावे हे आम्ही निक्षून सांगतो, वापराच्या प्रत्येक वेळी त्यातून रेडिअशन ची सातत्याने गळती होत असते… मात्र निरीक्षक म्हणून बघितल्यास त्या ओव्हन मध्ये आपल्याला एक जाळी आढळून येईल ते एकाप्रकारचे कवचच आहे.

ज्यावेळी आपण घरात कवच करण्याचे ठरवितो, सगळे घर करणे शक्य नसेल त्यावेळी किमान शयन कक्षाला कवच करणे आवश्यक ठरते….

५ जी ची तरंग लांबी ही मिलिमीटर मध्ये आहे तीच्या क्षेत्रात ती धोकादायकच आहे मात्र जाड भिंतीच्या आरपार ती जाऊ शकत नाही… ४जी ला देखील काही प्रमाणात जाड भिंत अटकाव करते. शास्त्रीय दृष्टीने जर धातूची जाळी योग्य पद्धतीने वापरली तर ९९% रेडीएशन  कमी होते , मात्र तज्ज्ञांच्या मते ९९.९९९९% इतकं भक्कम कवच हवं.

सुरुवात होते ती प्रारण/ रेडीएशनची पातळी तापसण्यापासून, ह्यासाठी EMF मीटर लागते… जे योग्य मानकांचे असावं लागतं.  मुंबई किंवा बंगळूर येथे EMF audit करून देणारे सशुल्क तज्ञ उपलब्ध आहेत ज्यांची माहिती आपल्याला indiamart.com या संकेतस्थळावर मिळू शकेल. आपल्या शहरात येऊन देखील ते सुविधा देतात.

मोजणी पश्चात उपलब्ध सामग्री खालील प्रमाणे

 • धातूंमिश्रित कापड ( फॅरेडे फॅब्रिक)- पडदे, कपडे, Wallpapers अश्याप्रकारे वापर होते
 • धातूची जाळी ५०*५० न मिळाल्यास डासांची 18*18 चे  दुघडी वापरतात… थेट पिंजरा बनविणे किंवा भिंतीवर मढविणे असा वापर शक्य
 • Shielding पेंट जसे की yshield, भिंतीवर ह्या रंगाचे किमान दोन थर देणे आवश्यक आहे
 • Shielding canopy(तंबू) : मच्छरदाणी सदृश्य थेट वापर शक्य
 • ग़्लास/काचेसाठी Anti-Radiation film मिळते जी 99% प्रारण रोधते

Safe zone: 1000 microwatt/ m2 is achievable, however expert says that safe zone is below 1 microwat /m2 for this an Bio-expert is must (suggested in case of cancer patients living nearer to cell tower)

सर्व साधारण माहिती आणि सोबतच घ्यावयाची काळजी 

 • घरातील, खोलीतील वायफाय हटवून WIRED नेटवर्क वापरणे Go wired! हाच कानमंत्र
 • अगदी मोबाईल साठी सुद्धा Ethernet adaptor मिळतात
 • Cordless फोन देखील तितकाच घातक असतो, किंबहुना जास्त घातक असतो
 • छपरावर धातुचा पत्रा असल्यास,धातु EMF परावर्तित करतात म्हणजे आतील मंडळी सुरक्षित
 • घरात 4 अँटेना वाला वायफाय राऊटर वापरणे ( dual band) हे जणू 5जी टॉवर इतकेच घातक ठरू शकते
 • Go wired! शक्य नसल्यास, रात्री झोपताना वायफाय संपूर्णपणे बंद करूनच झोपावे

उश्या पायथ्याला मोबाईल घेऊन झोपू नये… अगदीच अडचणी चे असल्यास flight mode चा वापर करावा

लहान मुलांच्या शरीरात मोबाईल तरंग (EMF) प्रौढांपेक्षा दुपटीने शोषले जातात आणि त्यांना प्रौढांपेक्षा जास्त त्रास होतो, सबब लहान मुलांना मोबाईल खेळायला देऊ नये. फोन वर बोलणे आवश्यक असल्यास स्पीकर फोन वापरावा

वीज पुरवठा आणि पर्यायाने voltage fluctuations मूळे देखील घरात रेडीएशन  होते, म्हणजे गादीच्या आजूबाजूला वायरिंग करून night लॅम्प लावणे हे अशास्त्रीय ठरते मॉडर्न नव्हे!

हवन यज्ञ अग्निहोत्र,  गोमय (शेण) च्या वापरांने  भिंत, भुमी, छप्पर सारवुन देखील EMF स्थिर होण्यासाठी सकारात्मक परिणाम आढळून आलेले आहेत, मात्र सखोल संशोधन अपेक्षित आहे

अधिक अभ्यास आणि माहितीसाठी

https://emfcenter.com/ is a full-service support center dedicated to helping people protect their health by reducing their exposure to electromagnetic fields (EMFs).  We provide practical science-based EMF training, information, design, testing, shielding and other consulting services, for people around the world who are concerned about EMFs.

https://emfacademy.com/ is a growing body of knowledge and research discussing the potential dangers of EMF radiation. Although this website began as a personal blog for the author, Christian Thomas, to discuss what he was learning as he studied EMF radiation, it is now one of the largest and most respected websites on the topic.

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *