सू लेखिका आहेत, त्यांनी ऑक्सफर्डमधे डॉक्टरेट केलीय, त्या लेख लिहितात, पुस्तकं लिहितात, कॉलेजात शिकवतात. शहराच्या वर्दळीपासून दूर जाऊन लेखन करावं यासाठी सू हेलपर्न न्यू यॉर्क राज्यातल्या एका डोंगरी खेड्यात रहायला गेल्या. गाव आकारानं मोठं होतं पण माणसं होती फक्त २ हजार. २ हजार माणसं २ हजार चौरस मैलाच्या परिसरात पसरलेली. डोंगराळ वस्त्या अशाच असतात. एक डोंगर, खूप अंतरावर दुसरा डोंगर, मधे घळ. डोंगरावर किवा घळीत एकादं घर. दुसरं घर दिसतही नाही इतक्या अंतरावर. औद्योगीक अमेरिका श्रीमंत झाली पण दूरवर असलेल्या खेड्यांची स्थिती मात्र आर्थिक दृष्ट्या सुधारली नाहीत.
गावात पुस्तकालय नव्हतं. पूर्वी एक पुस्तकालय होतं आणि विभागीय पुस्तकालयातून तिथं बसनं पुस्तकं येत. काही काळानं काही पुस्तकं परत जात, त्या जागी काही पुस्तकं नव्यानं येत., लक्ष न दिल्यानं ती व्यवस्था कोलमडली…