नरहर कुरुंदकर कोण होते आणि त्यांचे विचार आजही लागू होतात का?
नरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ – १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदापूर (जि. हिंगोली ) गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव.
त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्यपद भूषविले होते.विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
नरहर कुरुंदकर म्हटलं की, त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
– तुषार कुलकर्णी ( बीबीसी मराठी)
15 जुलै 2020
पुनर्लेखन 15 जुलै 2023