Availability: In Stock

हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम (काही आठवणी)

SKU: MH15

Original price was: ₹125.00.Current price is: ₹0.00.

Store
0 out of 5

प्रस्तावना 

हैदराबादचा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे पान. निझाम आणि इत्तिहाद्‌उलू मुस्लिमीन यांच्या रझाकारी शोषणापासून आणि अत्याचारापासून ज्यांनी हैदराबादला मुक्त करण्याकरिता अटीतटीचे प्रयत्न केले त्या स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, काजीनाथराव वैद्य, केशवराव कोरटकर, के. व्ही. नरसिंहराव, अच्युतभाई देशपांडे, रघुनाथराव रांजणीकर, सीताराम पप्पू, विजेंद्र कावरा या मंडळींच्यावरोबर ‘हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम’या ग्रथांचे लेखक शंकरभाई पटेल यांनी काम केले आहे. जेव्हा एखादा प्रसिद्ध इतिहास लिहिला जातो तेव्हा त्यात काही खरे, काही खोटे येऊ शकते. अशा वेळी भिन्न मताच्या लोकांनी मांडलेला इतिहास जपून ठेवणेही आवश्यक असते. हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामावर वसंत पोतदार यांनीही ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात अनेक चुका आहेत असे शंकरभाई पटेल यांचे म्हणणे. हीच गोष्ट अच्युत खोडवे यांना पण जाणवली. माझे मित्र अनंतराव भालेराव यांनी याच लढ्यावर “पेटलेले दिवस’ नावाचे पुस्तक लिहिले. उमरी बँक लुटण्याची घटना आणि नांदेडमधील चाउस इत्यादींच्या संबंधातल्या असलेल्या घटनांचा त्यांनी उल्लेख केला. आमचे दुसरे मित्र रघुनाथराव रांजणीकर यांना अनंतराव यांच्या कथनात काही त्रुटी जाणवल्या. वस्तुस्थिती अशी असते की, एखाद्या प्रदेशाचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा निरनिराळे इतिहासकार आणि त्या घटनेचे साक्षीदार यांनासुद्धा त्या इतिहासाचे सगळेच पापुद्रे माहीत नसतात आणि त्यांना त्यामुळे या घटनांत वेगवेगळा अर्थ जाणवतो. अशा वेळी ज्यांना जे सांगावयाचे आहे त्यांचे एकदा सांगून होणे महत्त्वाचे ठरते. कारण इतिहास म्हणून जे सांगितले जाते ते इतिहासाचे साधनमात्र असते. त्यामुळे जे जे हैदराबादवर इतिहास लिहिले गेले ते केवळ स्वकपोलकल्पित असले तरी ते प्रसिद्ध केले पाहिजेत असे मला वाटते.  

यादृष्टीने अनंतराव भालेराव, वसंत पोतदार यांचे ग्रंथ महत्त्वाचे आहेतच. तसेच शंकरभाई पटेल यांच्या ग्रंथालाही ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. उद्या श्री. सीताराम पप्पू किंवा दामोदर पांगरेकर किंवा के. व्ही. नरसिंहराव आदी लोक हैदराबाद स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहितील तेव्हा त्यालाही एक महत्त्व राहणार आहे. शंकरभाई पटेल हे एक मोठे कार्यकर्ते. त्यांचा अनुभव फार मोलाचा. शंकरभाई यांचे वय आता बरेच झाले आहे. त्यांनी यावेळी हा ग्रंथ लिहून पुढील पिढीवर मोठे उपकार करून ठेवले आहेत. आपला अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हेही एक मोठे समाजकार्यच असते. ते शंकरभाई पटेल यांनी पुरे केले आहे. आपले लेखन हे आपल्या अपत्यासारखे असते. आपले मूल वेळीच घरी परतले नाही तर आईच्या मनात हुरहूर लागते. या पुस्तकास विलंब लागत आहे असे पाहून शंकरभाईंनाही हुरहूर लागणे स्वाभाविक आहे. पण लेखनानंतरच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असतो. शंकरभाई पटेल यांच्या ग्रंथ-प्रकाशनास विलंब लागला, त्यास साहित्य आणि संस्कृती मंडळाचा नाईलाज होता. हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात मंडळाकडून कोणतीही कुचराई झाली नाही असे मी शंकरभाई पटेल यांना आश्वासन देतो. हा ग्रंथ प्रसिद्ध करताना मंडळास आनंद होत आहे हे सांगणे नकोच.

सुरेन्द्र बारलिंगे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

२ ऑक्टोबर १९८६

Digital Book

1000 in stock

  Ask a Question

Description

अध्यक्षांचे निवेदन

श्री. शंकरभाई पटेल यांनी लिहिलेले “हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम” हे पुस्तक ऑक्टोबर १९८६ मध्ये मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आले होते. या पुस्तकात असंख्य मुद्रणदोष असल्याचे आणि त्याच्या मुखपृष्ठाची छपाई गचाळ असल्याचे आढळले. रणजित प्रकाशन, कोल्हापूर या संस्थेने या पुस्तकाचे मुद्रण मंडळाचे तेव्हाचे सदस्य डॉ. एस. एस. भोसले यांच्या निरीक्षणाखाली करावे असे ठरले होते. प्रकाशित पुस्तकाचे मुद्रण अत्यंत असमाधानकारक झाले असल्याचे प्रकाहन समारंभ पार पडल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे मूळ पुस्तकाचे वितरण करण्याऐवजी लेखक श्री. शंकरभाई पटेल यांच्या संमतीने सुधारित मुद्रणप्रत मागवून ती छापण्याचा तेव्हाच्या मंडळाने निर्णय घेतला.

दुर्दैवाने मूळ पुस्तकाचे लेखक श्री. शंकरभाई पटेल यांचे निधन झाल्यामुळे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचे ज्येष्ठ सेनानी श्री. गोविदभाई श्रॉफ यांच्याबरोबर विचारविनिमय करून प्रा. भगवंतराव देझमुख यांनी सुधारित मुद्रणप्रत मंडळाच्या स्वाधीन केली. ती माहितीच्या दृष्टिने शक्‍य तितकी निर्दोष व्हावी यासाठी श्री. गोविंदभाई श्रॉफ आणि प्रा. भगवंतराव देशमुख यांनी अपार परिश्रम घेतले. तसेच या दोघांनी या पुस्तकाची मुद्रितेही काळजीपूर्वक तपासून दिली. त्यासाठी कोणतेही मानधन न घेता त्यांनी मंडळास मदत केली याबद्दल मंडळ त्यांचे सदैव कर्णी राहील.

श्री. शंकरभाई पटेल आज हा ग्रंथ प्रकाशित होत असताना हयात नाहीत याबद्दल हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेच मंडळाच्या सदस्यांनाही अत्यंत दुःख होत आहे. शंकरभाईंच्या या आठवणी म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा समग्र विश्वसनीय इतिहास आहे असे समजण्याचे कारण नाही.या लढ्यातील ज्या घटनांशी शंकरभाईंचा प्रत्यक्ष संबंध आला त्यांच्याबद्दल तपज्ञीलवार साक्ष देण्यावर शंकरभाईंचा जास्त भर आहे. ते स्वतः या लढ्यात सहभागी झालेले असल्यामुळे विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिणे साहजिक होते. स्वातंत्र्यलढ्याविषयी कुतूहल असलेल्या सर्वसामान्य वाचकाला त्याचप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकांना एक महत्त्वाचे साधन म्हणून हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

य. दि. फडके
अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
३० एप्रिल १९९३

अर्पण

हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामाचे शिल्पकार आणि या संग्रामातील ज्येष्ठ सेनानी, माझ्या राजकीय जीवनातील आदरणीय गुरू, निष्ठावान लोकनेते श्री. गोविंददासजी श्रॉफ यांना –

प्रिय गोविदभाई,

माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपण जवळ केले; राजकीय जीवनातील सहकारी म्हणून विश्वसनीयांत माझी गणना केली; हैदराबादच्या स्वातंत्र्य-संग्रामातील एक सैनिक होण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आणले; या सर्व आठवणींनी माझे मन कृतज्ञतेने उचंबळून येते.

हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामात औरंगाबाद जिल्ह्यात घडलेल्या अनेक रोमहर्षक प्रसंगांचा मी एक जिवंत साक्षीदार! आज मी जराजर्जर झालो आहे. सारे जीवन उजळून टाकणाऱ्या स्वातंत्र्य संग्रामातील या माझ्या आठवणी.

आपणांविषयीच्या कृतज्ञतेने ठिबकणारे हे माझे आनंदाश्रू, निरपेक्ष प्रेमाने व अतीव भक्तिभावाने मी आपल्याच चरणी अर्पण करीत आहे. स्वीकार व्हावा.

शंकरभाई पटेल, औरंगाबाद
२ ऑक्टोबर १९८६

अनुक्रमणिका

  • प्रस्तावना

  • अध्यक्षांचे निवेदन .

  • कै. श्री. शंकरभाई पटेल

  • निझामी राजवट

  • महाराष्ट्र परिषद

  • १९३८ चा सत्याग्रह

  • वैयक्तिक सत्याग्रह

  • १९४७ चा सत्याग्रह

  • कारागृहातून पलायन

  • रझाकार व सरंजामी राजवट 

  • सशस्र लढा

  • निझामी हद्दीतील लढ्याची काही केन्द्रे

  • शस्त्रासाठी कारागृह

  • रझाकारांचे अत्याचार आणि पोलीस कारवाई

Please follow and like us:
Pin Share

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम (काही आठवणी)”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.