• -100% Dhondo keshav karve

    महर्षी धोंडो केशव कर्वे

    0

    अण्णासाहेबांना खंत होती, ती ही की स्वातंत्र्यानंतर समता आलेली नाही. समता आल्याशिवाय स्वातंत्र्याची खरी गोडी चाखता येणार नाही, असे ते म्हणत. महर्षी कर्वे यांनी कधीही तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा लोकांना कोणता उपदेश केला नाही. कर्वे यांचे कार्य हाच कर्वे यांचा संदेश होता. ‘आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण झाडापर्यंत तरी जाईल’ या वचनाप्रमाणे कर्वे कार्य करीत राहिले.

    कर्वे यांच्या थोरवीबद्दळ आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘मी कोण आहे’ असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला आणि त्याचे वस्तुनिष्ठ उत्तर स्वतःच शोधून काढले. म्हणूनच ते म्हणतात-“मी समाजकार्याला सर्वस्वी वाहून घेतले नाही. संसारी माणूस व संन्यासी वा त्यागी माणूस या दोघांच्या मधला मार्ग मी स्वीकारला. मी संसार नेटका केला नाही. कसाबसा करीत राहिलो. अजूनही करीत आहे. कुटुंबासाठी घरदार किंवा द्रव्यसंचय मी केला नाही. जरुरीपुरतेच वैयक्तिक व कौटुंबिक स्वार्थाकडे लक्ष देऊन बाकीचे सामर्थ्य व उर्वरित द्रव्य लोकहिताच्या कामी खर्चणे हा माझा स्वभाव बनला आहे.”स्वतः विषयीची वस्तुनिष्ठ जाणीव व स्वतःचे यथार्थ मूल्यमापन थोड्याच लोकांना करता आले. महर्षी कर्वे यांनी असे मूल्यमापन स्वतः केले.

    धर्म, नीतिशास्र आणि तत्त्वज्ञान यासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचे सर्व आचरण धर्माधारित होते. हा धर्म कोणता? सद्‌विचारधर्म. अण्णासाहेबांनी धर्मविचारात आणि कर्माचरणात कर्मकांडाळा कधीच स्थान दिले नाही. त्यांचा मानसिक पिंड एखाद्या संन्याशासारखा अविचल आणि निर्विकार होता. 

    Original price was: ₹35.00.Current price is: ₹0.00.