Description
इ. स. १९७३ सालच्या आवृत्तीची प्रस्तावना
भारतीय लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचे महान कार्य करणाऱ्या भागवतधर्माच्या इमारतीचा पाया संत शिरोमणी ज्ञानोबारायांनी घातला तर त्या मंगल मंदिरावर कळस संतश्रेष्ठ तुकारामबावांनी चढविला. महाराष्ट्राचे हे परम भाग्य की त्याला संतकृपेची अखंड छाया लाभली. एवढे भौतिक परिवर्तन झाले असतानाही ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या नावांचा गजर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सतत आजही घुमत असून, या नामगजराश्ली खेड्यापाड्यांतील सर्वसामान्य जनता एकरूप झाली आहे.
महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतपंचकाने बहुमोल असे.साहित्य निर्माण करून जनसामान्यापर्यंत अध्यात्माचे विचार नेले आणि सामान्य जनतेला अध्यात्माची गोडी लावण्याचे एक महान ऐतिहासिक कार्य केले. परिणामतः राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता शाबूत राहिली. म्हणून या लाडक्या संतांचे समग्र वाडमय म्हणजे महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा एक अमूल्य असा सांस्कृतिक ठेवा आहे. या संतांच्या मालिकेत श्री तुकारामबावांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांनी सोप्या नामभक्तीचा महिमा पटवून आपल्या अभंगांद्वारे सुविचार व सदाचाराचा प्रसार केला व समाजात भक्तिमार्गाच्या द्वारा नवचैतन्य निर्माण केले आणि आपल्याबरोबरच साऱ्या समाजाला सन्मार्गाला लावले. त्यांच्या बहुमोल वाड्मयाचा ठेवा श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा पुनर्मुद्रित करून कार्तिकी एकादशीच्या या पवित्र दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करीत असता मला विशेष आनंद होत आहे.
श्री तुकारामबावांच्या गाथेचे मुद्रण व प्रकाशन दोन भागांत श्ञासनाने १९५० साली प्रथम केले, त्यानंतर त्यांचे पुनर्मुद्रण शासनातर्फे १९५५ साली करून एका पुस्तकातच छापून ती प्रसिद्ध केली. त्याच्याही प्रती फार लवकर संपल्या. मध्यंतरी महाराष्ट्र शासनातर्फे संत नामदेवांच्या सातश्षोव्या जयंतीनिमित्त श्री नामदेव गाथा १९७० साली प्रसिद्ध केली व १९७१ साली एकनाथषष्ठीला श्री एकनाथी भागवत अल्प मूल्यात जनतेस उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर केव्हाच अप्राप्य झालेली श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा पुनर्मुद्रित करून आज प्रकाशित करण्याचा योग येत आहे.
विषयानुक्रम
- निवेदन.
- इ. स. १९७३ सालच्या आवृत्तीची प्रस्तावना…
- इ. स. १९५० सालच्या आवृत्तीची प्रस्तावना…
- इ. स. १९५५ सालच्या आवृत्तीची प्रस्तावना…
- ॥ तुकारामाचे अभंग ॥
- देहू व तळेगांव या प्रतींत खालीं लिहिल्या प्रमाणें ज्यांचा आरंभ झालेला नाहीं असे पंढरपुरच्या प्रतींतले अभंग.
- तुकारामबावांच्या अभंगांतील कठीण शब्दांचा कोश. ….
- अभंगांची अनुक्रमणिका…
- परिशिष्ट…
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥ १२ ॥
मानियेला स्वप्नी गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥ १३ ॥
Reviews
There are no reviews yet.