• -100%

    श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा

    0

    निवेदन 

    पंढरपूरचा श्री विठ्ठल हा जसा आपल्या ‘विठोबा’ या मराठमोळ्या नावाने महाराष्ट्रीय समाजाच्या हृदयामध्ये अत्यंत आदरपूर्वक प्रस्थापित झाला आहे, त्याप्रमाणेच त्याचा परमभक्त संत तुकाराम यालाही महाराष्ट्राच्या मनामध्ये अद्वितीय आणि अलौकिक स्वरूपाचे स्थान मिळालेले आहे. मराठी भक्तजन श्री ज्ञानदेवांच्याबरोबरच संत तुकारामांनाही परमश्रध्येय मानतात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा उत्कट भावाने गजर करतात. श्री विठ्ठल, श्री नामदेव, संत तुकाराम ही महाराष्ट्राची आराध्य दैवते आहेत. श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या अजोड प्रतिभेने जज्ञी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच उत्कट भक्तीभावाने संत तुकारामांनी आपले अभंग लिहिले. तुकाराम हे महाराष्ट्रातील संत मंडळींचे शिरोभूषण मानले जातात. गेली साडेतीनशे वर्षे तुकारामांची गाथा महाराष्ट्राने हृदयाशी बाळगून आध्यात्मिक वाटचाल केली आहे.  

    जनसामान्यांना प्रिय असलेल्या संत तुकारामांची सकल गाथा प्रसिद्ध करून ती सर्वांना उपलब्ध करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई सरकारने १९५० साली घेतला आणि शासनामध्ये न्यायमूर्ती या उच्च पदावर काम करतानाही अंतरीचे काव्यगुण जोपासणाऱ्या आणि संत वाड्मयाचा प्रगाढ व्यासंग असलेल्या स्व. पुरुषोत्तम मंगेश लाड या विद्वान सनदी अधिकाऱ्याची गाथेच्या संपादनासाठी नियुक्ती केली. लाड हे स्वतः उत्तम कवी होते आणि त्यांचा संत वाड्मय आणि आधुनिक कविता यांचा विशेष अभ्यास होता. तुकारामांची गाथा संपादित करून प्रकाशित करण्याचे महत्‌ कार्य लाडांनी स्वीकारले आणि आपल्या अतिशय विवेचक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह १९५० साली तुकारामांची गाथा शासनातर्फे प्रथम प्रकाशित झाली. तिचे वाचकांनी अभूतपूर्व स्वागत केले. १९५५ साली तुकाराम बीजेला गाथेची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर १९७३ साली तिसरी आवृत्ती शासनातर्फे प्रकाशित झाली आणि आता ती दुर्मीळ झालेली आहे.  

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे श्री एकनाथी भागवत आणि श्री नामदेव गाथा हे दोन बहुमोल ग्रंथ पुन्हा प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे दुर्मीळ झालेली तुकारामांची गाथासुद्धा पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १९५० साली प्रथम प्रकाशित झालेल्या गाथेच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा सुयोग सध्याच्या मंडळाला लाभलेला आहे. श्री नामदेव, श्री एकनाथ आणि संत तुकाराम यांचे वाड्मय महाराष्ट्राला पुन्हा अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्याची सुसंधी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. संत तुकारामांना विनम्र भावाने अभिवादन करून ही गाथा मी महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करीत आहे.  मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. 

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% समर्थ

    समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी

    0

    समर्थ चरित्राची रूपरेषा

    आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला संत परंपरेचे फार मोठे वरदान लाभले आहे. विशेष म्हणजे मराठी संतांनी केवळ चमत्कार केले नाहीत तर त्यांनी चिरंतन असे आध्यात्मिक विचारधन पाठीमागे ठेवले.  हजारो वर्षे मराठी माणूस या विचारांच्या प्रकाशात जीवनाची यशस्वी वाटचाल करीत राहील. आद्यतम कवी मुकुंदराजांचा विवेकसिंधू, संत शिरोमणी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे हजारो अभंग, समर्थ रामदासांचा दासबोध, संत एकनाथ महाराजांचे भागवत हे सारे ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राची खरी संपदा आहे. संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई आदी संतांनी देखील या विचारधनात मौलिक भर घातली. महाराष्ट्रातील संतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ भाबडेपणा किंवा अंधश्रद्धा यांना कधीही खत-पाणी घातले नाही. त्यांनी मराठी माणसाचे ज्ञानचक्षू उघडले. त्याची विचारशक्ती जागी केली. या सर्व संतांनी शास्त्रशुद्ध परिभाषेत आध्यात्मिक विचार दिले. प्रस्तुत ग्रंथात आपण समर्थ रामदासांच्या समग्र साहित्याचा परामर्श घेणार आहोत. 

    अनुक्रमणिका

    • निवेदन……
    • समर्थ चरित्राची रूपरेषा…
    • करूणाष्टके : समर्थांचे आत्मचरित्र ….
    • मनाचे श्लोक…..
    • आत्माराम…..
    • तुळजाभवानीची स्तोत्रे
    • हनुमंताची स्तोत्रे…
    • गुरुगीता
    • समर्थांचा पत्रव्यवहार
    • राजधर्म, क्षात्रधर्म अखंड सावधानता…
    • मुसलमानी अष्टक
    • ग्रंथराज दासबोध..
    • समर्थांच्या आरत्या …..
    • भौगोलिक स्थानांची वर्णन ……
    • एकवीस समासी : जुना दासबोध ….
    • काही स्फुट प्रकरणे ….
    • समर्थांची लोकसाहित्य रचना….
    • धन्य ते गायनी कळा …..
    • समर्थांचे अभंग …
    • संदर्भ ग्रंथ…..

    Digital Book 

    Original price was: ₹60.00.Current price is: ₹0.00.
  • -100%

    मुलखावेगळा राजा (औंधाचा राजा)

    0

    लेखकाचे काहीतरी

    मुलखावेगळा राजा ही गोष्ट आहे औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं यांची. इतिहास नाही, पण सत्य गोष्ट आहे. भावनेत, स्मृतींत, जशी नोंद झाली आहे तज्ञीच सांगितली आहे.

    व्यक्ती सर्वच्या सर्व खऱया आहेत, काल्पनिक नाहीत, त्यांच्यासंबधीचा काही मजकूर त्यांना आवडणार नाही, कदाचित बोचेलसुद्धा. त्याबद्दल अगदी सपशेल, बिनशर्त दिलगिरी. कोणाला दुखविण्याचा, डिवचण्याचा हेतू नाही.

    सर्व संवाद भावना-स्मृतीत आहेत तसे, थोड्याफार फेरफाराने घातले आहेत. हे संवाद ध्वनिफितीवर नोंदले वा कागदावर टिपले नव्हते. पण त्यामागील भावना, हेतू सत्य आहे.

    साल, महिना, तारीख कदाचित काही ठिकाणी चुकली असणार. त्याबद्दल क्षमायाचना.

    श्री. रवींद्र कुलकर्णी यदुनाथ थत्तेंना घेऊन आले नसते तर ही गोष्ट कागदांवर आली नसती.

    गोष्ट लिहिताना जो आनंद वाटला त्याबद्दल त्या दोघांना धन्यवाद.

    आप्पा पंत – (पंत निवास : बंगलोर-लोणावळा)

    “पंत निवास”, भांडारकर रोड, पुणे ४११००४

    औंधाचा-राजा-भवानराव

    Digital Book

    Original price was: ₹35.00.Current price is: ₹0.00.
  • पाताळयात्रा

    0

    दक्षिण अमेरिकेतील पेरु येथील एका नगण्य कंपनीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी तीन विलक्षण बुद्धिमान भारतीय इंजिनीयर्स निघतात आणि अचानक… अचानक मती गुंग करणारा अपघात होतो. तर्काला आव्हान देणारी कलाटणी मिळते. दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृती एखाद्या गुढासारखी छळत राहते. भूत, भविष्य, वर्तमानकाळाची संकल्पना विसरली जावी, अशा घटना घडत जातात.

    एका अनोख्या अनुभवाचे दालन उघडून, कृष्णविवरामध्ये गतिमान होऊन स्वत:चे अस्तित्व विसरायला लावणारी ही पाताळयात्रा लेखकाच्या भूमिकेमुळे अधिकच उत्कंठावर्धक झाली आहे.

    — संतोष सावंत, लोकसत्ता ११ मे २००३

    0.00