Description
…भाषा, जातपात आणि देश ह्या सगळ्या भिंती ओलांडून कलावंत नवीन सृष्टि निर्माण करतो…माणुसकी आणि रसिकता ह्यांनी भरलेल्या ह्या नाट्यसृष्टीचे बाल गंधर्व सम्नाट आहेत. …बाल गंधर्व हे मराठी रंगभूमीच्या सुवर्ण युगाचे अग्रदुत आहेत. पुन्हा असा नट होणार नाही – यशवंतराव चव्हाण
बालगंधर्व म्हणजे महाराष्ट्राचे संगीतछत्रपती!…बालगंधर्व बोलायचा विषय नाही.. ऐकायचांविषय आहे. शिवरायाचा आठवावा प्रताप-तसे बालगंधर्वांचे आठवावे स्वरुप. बालगंधर्वाचे आठवावे गायन! असेच म्हणावे लागेल. – आचार्य अत्रे
बाल गंधर्वांचा मी ऋणी आहे. . -र्नाट्याचार्य खाडीलकर
मला चांगलं गाणं ऐकावसं वाटलं की मी बालगंधर्वांच्या नाटकाला जाऊन बसतो. –अलादियांखांसाहेब
“माझे अन्नदाते, माय बाप हो, तुमच्या आशिर्वादाने मी जिवंत आहे. ह्या पेक्षा जास्त मी काय बोलणार? …देवा जवळ मला एकच मागणे मागायचे आहे. परमेश्वरा माझ्या रसिकांना उदंड आयुष्य दे!”
नारायणरावांचे हे शेवटचे भाषण! त्यात त्यांनी स्वतः साठी काही मागितले नाही परमेश्वराजवळ उदंड आयुष्य मागितले ते आपल्या ‘अन्नदाते मायबापांसाठी!!
मग प्रश्न पडतो, रसिकांनी बालगंधर्वावर अधिक प्रेम केलं की बालगंधर्वांनी त्यांच्या रसिकांवर… कुणी कुणासाठी जीव ओवाळून टाकला!
Reviews
There are no reviews yet.