Availability: In Stock

लोककवी शाहीर रामजोशी

SKU: MH17

0.00

Store
0 out of 5

रामजोशी म्हणजे परस्पर विरोधी प्रवृत्तींचा मनोज्ञ संगम. 

असा संगम फारच थोड्या लोकांच्या ठायी झालेला दिसतो. त्यांची डफावर दणकट थाप देणारी बोटे तितक्‍याच नजाकतीने वीणेच्या ताराही छेडीत असत. झाहीर आणि कीर्तनकार, व्युत्पन्नता आणि पाचकळपणा, गंभीरता आणि पोरकटपणा, भोगलोलुपता आणि त्याग, श्रृंगार आणि वैराग्य या सार्‍या गोष्टी रामजोशींच्या व्यक्तीमत्वात एकवटलेल्या दिसतात. पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य यांना जोडणारा रामजोशी हा महत्त्वाचा दुवा आहे.

जगण्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगावा या वृत्तीने रामजोशींनी आयुष्याकडे पाहिले.  शृंगारकविता जितक्या तन्मयतेने त्यांनी लिहिली तज्ञाच उत्कटतेने उपदेशपर कविताही निर्माण केली. मराठी भाषेत रचना करतानाच त्यांच्या लेखणीने संस्कृतभाषेचा प्रदेशही पाहिला.  संस्कृत, मराठी,  कानडी, हिंदी भाषेचा वापर करून लावणी रचण्याचे चातुर्य त्यांनी दाखविले.  शीघ्रकवित्व आणि समयसूचकता हे दोन गुण त्यांच्याजवळ होते. मोरोपंतावर त्यांचे जितके प्रेम होते तितकेच घोंडीवर देखील होते.

गिरीचा व्यंकटेश त्यांना जितका प्रिय होता. तितकाच बार्शीचा भगवंतदेखील प्रिय होता. पंढरीचा पांडुरंग त्यांचा प्रेमविषय होता. तशीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीवरही त्यांचे प्रेम होते. शिवशक्तीची उपासनाही कमीअधिक प्रमाणात त्यांनी केलीच होती. आणि तरीही इतक्या परस्परविरोधी प्रवृत्तींचा संगम ज्यांच्या व्यक्तीमत्वात होता, त्या कविरायांची कविता ही अस्सल मराठमोळी कविता आहे. हे लक्षणीय आहे.

Digital Book

Book info

शिरीष श्रीकृष्ण गंधे
118

1000 in stock

  Ask a Question

Description

निवेदन

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अज्ञा व्यक्तींची साधारणतः शंभर ते सव्वाज्ञे पानाची सुबोध मराठी भाषेत चरित्रे लिहून ती “महाराष्ट्राचे शिल्पकार” या योजनेअंतर्गत पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याची मंडळाने योजना आखली असून या चरित्रग्रंथमालेतील “लोककवी शाहीर रामजोशी” हा तेविसावा चरित्रग्रंथ आहे.

शाहीरांचं मराठी कवितेला मिळालेलं योगदान विशेषत्वानं लक्षात घेण्यासारखे आहे. ज्या काळात मराठी कविता पांडित्याच्या जोखडात अडकून पडलेली होती, आध्यात्माशिवाय अथवा भक्तीशिवाय इतर विषय जिनं वर्ज्य मानलेले होते त्या काळात शाहीराने आध्यात्म्याच्या जोखडातून तिला मुक्‍त केले. भक्तीशिवाय अथवा आध्यात्माशिवाय इतरही विषय कवितेचे विषय होऊ शकतात हा आत्मविश्वास लोकांच्या मनात जागविला. इतकेच नव्हे तर लावणीच्या रूपानं तिला जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचं ऐतिहासिक कार्य केलेलं आहे. शाहीरांचं हे ऋण मराठी कवितेनं मान्य करायलाच हवे.

लोककवी शाहीर रामजोशी हा शाहीरांचा मुकूटमणी आहे आणि म्हणूनच “महाराष्ट्राचे शिल्पकार” या मंडळाच्या चरित्रग्रंथमालेअंतर्गत या शाहिरावरचा चरित्रग्रंथ प्रकाश्रित करण्यात  मंडळाला विशेष आनंद होत आहे. प्रा. शिरीष गंधे यांनी या चरित्रग्रंथाचे लेखन समरसून तर केलेले आहेच; पण त्याशिवाय चरित्रग्रंथासाठी रूढ असलेल्या लेखन पद्धतीचा अवलंब न करता कथात्मक लेखन पद्धतीचा अवलंब केला आहे. प्रसंगाची मांडणीही अतिशय नाट्यपूर्ण रीतीने कलेली आहे. अर्थात अज्ञा लेखन पद्धतीचा अवलंब केल्यास चरित्रग्रंथात काही त्रुटी संभवतात; पण या ग्रंथात अशा त्रुटी अभावानाच आढळतात.

कथात्मक स्वरुपाच्या लेखनाला पोषक असलेली शैली मूलतः प्रा. शिरीष गंधे यांना लाभलेली आहे. शाहीर रामजोशींच्या निधनामुळं निर्माण झालेल्या स्थितीचं खाली उद्धृत केलेलं वर्णन या संदर्भात पुरेसं बोलकं आहे, असं मला वाटतं.

मराठी काव्यसुंदरीच्या पायातील घुंगरु निखळले, डफ अबोल झाला, वीणेचा झंकार थांबला, ढोलकीवर बंद बोल पडला. मराठी भाषेत नितांतसुंदर लावणी रचना करून, मराठी शारदेची उपासना करणारा सच्चा उपासक काळाच्या पडद्याआड गेला. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांना जोडणारा साकव कोसळून पडला. सामान्य माणसांच्या प्रेमापोटी घरातून बाहेर पडलेली पावलं अगतिक झाली तर डफावर नर्तन करणारी बोटे कायमची विसावली.

लौकिक अर्थानं शाहीर रामजोशींची बोटं भलेही विसावली असतील; पण या बोटातून झरलेली कवनं अजरामर झालेली आहेत.

रा. रं. बोराडे  – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

दिनांक : १९ मे, २००४

Please follow and like us:
Pin Share

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोककवी शाहीर रामजोशी”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.