Availability: In Stock

महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड (भाग २) १७०७ ते १८१८

SKU: MH13

0.00

Store
0 out of 5

लेखकाचे हृद्गत

मराठ्यांच्या इतिहासापैकी थोरले शाहू महाराजांपासून पेशवाई अखेरच्या कालखंडाचा इतिहास लिहिण्याचे काम महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने माझ्यावर सोपविले होते. ह्या कालखंडाचा इतिहास आपल्या पूर्वजांनी शौर्य, वीर्य, तेज आदी गुण दाखवून घडविला, त्याबद्दल आपण सर्व महाराष्ट्रीयांस जास्त आपुलकी व जवळीक वाटते व तो इतिहास सर्वाना आवडतो.

पेशवा कालखंड लिहित असता या सर्व कालखंडांचा इतिहास ७०० पृष्ठात सामाविला जाईल असा प्रयत्न या ठिकाणी मी केला आहे. ह्या कालखंडातील पेशवे व शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन आदी मातब्बर सरदार या एकेकट्यांचा साद्यंत इतिहास लिहावयाचा तर त्यासही ७०० पृष्ठे खर्ची पडतील, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे हे वीर पुरुष आहेत. अशा परिस्थितीत हा इतिहास लिहिताना मला नाइलाजास्तव बरीच काटछाट करावी लागली आहे. थोरले बाजीराव, महादजी शिंदे, होळकर यांच्या पराक्रमांचे वर्णन करताना सर्व शरीर रोमांचित होते आणि दुसरा बाजीराव, दौलतराव शिंदे व उत्तर कालातील मराठे सरदारांना एकएकटे गाठून इंग्रजांनी त्यांचा केलेला पराभव हे लिहित असता मन उद्विग्न होते व रडू कोसळते. असा हा हर्षामहर्षाचा मराठी राज्याचा इतिहास माझ्या हातून लिहून पुरा करून घेतला, ह्याबद्दल त्या जगन्नियंत्याचे मी आभार मानतो. एवढे मोठे काम एकहाती करत असता काही उणिवा व चुका होणे अपरिहार्य आहे ह्याची जाणीव मला आहे.

– लेखक 

प्रस्तुत खंडाचे लेखन डॉ. खोबरेकर यांनी केले असून या कालखंडात इ. स. १७०७ ते १८१८ पर्यंतचा इतिहास देण्यात आला आहे. उपलब्ध नवीन संदर्भ व संशोधन यावरून हे लेखन डॉ. खोबरेकर यांनी केले असून वाचक या एकत्रित इतिहासाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

Digital Book

Book info

डॉ. विठ्ठल गोपाळ खोबरेकर
636

1000 in stock

  Ask a Question

Description

लेखकाचे हृद्गत (संक्षिप्त)

मराठ्यांच्या इतिहासापैकी थोरले शाहू महाराजांपासून पेशवाई अखेरच्या कालखंडाचा इतिहास लिहिण्याचे काम महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने माझ्यावर सोपविले होते. ह्या कालखंडाचा इतिहास आपल्या पूर्वजांनी शौर्य, वीर्य, तेज आदी गुण दाखवून घडविला, त्याबद्दल आपण सर्व महाराष्ट्रीयांस जास्त आपुलकी व जवळीक वाटते व तो इतिहास सर्वाना आवडतो.

ह्या कालखंडाच्या इतिहासाची साधने अफाट आहेत. ह्या कालखंडावरील रियासतकार सरदेसाई यांच्या एकूण ९ रियासती असून त्यांची एकूण पृष्ठे ३,३०० आहेत. तसेच मराठीशिवाय इंग्रजी, पोर्तुगीज साधनेही भरपूर आहेत. ह्या सर्वाचा उपयोग मी केलेला आहे.

पेशवा कालखंड लिहित असता या सर्व कालखंडांचा इतिहास ७०० पृष्ठात सामाविला जाईल असा प्रयत्न या ठिकाणी मी केला आहे. ह्या कालखंडातील पेशवे व शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन आदी मातब्बर सरदार या एकेकट्यांचा साद्यंत इतिहास लिहावयाचा तर त्यासही ७०० पृष्ठे खर्ची पडतील, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे हे वीर पुरुष आहेत. अशा परिस्थितीत हा इतिहास लिहिताना मला नाइलाजास्तव बरीच काटछाट करावी लागली आहे. थोरले बाजीराव, महादजी शिंदे, होळकर यांच्या पराक्रमांचे वर्णन करताना सर्व शरीर रोमांचित होते आणि दुसरा बाजीराव, दौलतराव शिंदे व उत्तर कालातील मराठे सरदारांना एकएकटे गाठून इंग्रजांनी त्यांचा केलेला पराभव हे लिहित असता मन उद्विग्न होते व रडू कोसळते. असा हा हर्षामहर्षाचा मराठी राज्याचा इतिहास माझ्या हातून लिहून पुरा करून घेतला, ह्याबद्दल त्या जगन्नियंत्याचे मी आभार मानतो. एवढे मोठे काम एकहाती करत असता काही उणिवा व चुका होणे अपरिहार्य आहे ह्याची जाणीव मला आहे.

वि. गो. खोबरेकर.

९, यशोधाम, रिलीफ रोड,

सांताक्रूझ (प.) मुंबई-४०० ०५४.

दिनांक: १मे १९८८.

अनुक्रमणिका

  • निवेदन…
  • लेखकाचे हृद्गत…..
  • १ शाहू महाराजास राज्य प्राप्ती…..
  • २ छत्रपती शाहूंची कारकीर्द पेशवा बाळाजी विश्वनाथ (१७१३–१७३०) …..
  • ३ मुलूखगिरीद्वारा मराठी सत्तेची वाढ…
  • ४ छत्रपति शाहू-,पेशवे बाजीराव.
  • ५ पेशवे बाजीराव-राज्यविस्तार
  • ६ पेशवे बाजीराव—-मोगल सत्तेस तडाखे (१७३२—-१७३८)…
  • ७ बाजीराव कारकीर्दीची शेवटची दोन वर्षे (१७३८-४० …
  • ८ शाहू व बाळाजी बाजीराव (१७४०-४९)…
  • ९ शाहू महाराजांची अखेर व पुढील व्यवस्था
  • १० पेशवे-निजाम संबंध …
  • ११ मराठ्यांचा कर्नाटकातील उद्योग (स. १७५१–१७६०)
  • १२ बाळाजी बाजीराव व उत्तर हिंदुस्थान (सन १७५२ ते १७६१)….
  • १३ मराठेशाहीचे पुनरुत्थान-.पेशावे माधवराव यांची छाप बसली …
  • १४ माधवराव पेशवे (१७६६-७२) …..
  • १५ नारायणराव पेशव्यांची ९ महिन्यांची कारकीर्द व बारभाईचे कारस्थान (१७७३–७६) ….
  • १६ राज्यांतील अन्य घडामोडी (१७७९ पर्यंत) …..
  • %७ इंग्रज-मराठे युद्धाचा शेवट (१७७९–८२)….
  • १८ दिल्लीकडील राजकारणे (सन १७८३–१७८८) …..
  • १९ महादजी शिंदे यांच्या उत्तरेतील कामगिरीचा शेवट (इ. स. १९८९ ते १७९१…
  • २० मराठेशाहीतील स्वास्थ्याचा अंतर्गत शांतता व राज्य वृद्धीचा काळ (१७८४–१७९२)…
  • २१ पुण्यातील घटना, महादजी व सवाई माधवरावांचा मृत्यू (१७९२–१७९५) …..
  • २२ पेशवाईचा प्रदोष काल (सन १७९५-,१८०२) …..
  • २३ पेशवा स्वातंत्र्य गमावतो (१८०२-१८०३)
  • २४ इंग्रजांचे शिंदे–भोसल्यांशी युद्ध (इ. स.१८०३, ऑगस्ट ते १८०४, जुलै अखेर)….
  • २५ होळकरांशी इंग्रजांची झोंबाझोंबी …..
  • २६ गेलेली सत्ता मिळविण्याची बाजीरावांची धडपड.
  • २७ इंग्रजांचा गायकवाडीत शिरकाव…
  • २८ पेशवे–गायकवाड तंटा मिटविण्यासाठी इंग्रजांची मध्यस्थी… ….0५३
  • २९ गंगाधर शास्त्र्याचा खून व बाजीरावांची गळचेपी
  • ३० पेशवाईचा अस्त …
  • ३१ शेवटचा प्रवेश ….. 
  • ३२ राज्ययंत्रणा, आर्थिक व सामाजिक जीवन … ….
  • १ मराठेशाहीतील राज्ययंत्रणा –
  • राज्यव्यवस्था मुलकी व सैनीकी : -…
  • जमीन महसूल व्यवस्था-शिवकाल : -..
  • मराठामंडळ अंतर्भूत निरनिराळे मराठे सरदार, छत्रपती व पेशवे ह्यांचे एकमेकांशी असलेले संबंध
  • मुलकी कारभार-राजकीय विभाग व त्यावरील अधिकारी
  • शिवकालीन गोत; शिवकालीन राजसत्तेच्या चारसत्ता अशा
  • आर्थिकस्थिती 
  • समाज जीवन प
  • मराठेकालीन संस्कृती.-…. 
  • मूल्यमापन  .. 
  • परिशिष्ट १ मराठेशाहीतील मद्यपानविषयक धोरण आणि शासनव्यवस्था ….
  • परिशिष्ट २ युरोपियनास घडलेले १८ व्या शतकातील समाजदर्शन ….
  • परिशिष्ट ३ वंशावळ… 
  • संदर्भ ग्रंथसूची…
  • व्यक्‍तिस्थळ सूची… 
  • लेखक परिचय ….. 
  • नकाशे . 
  • १ मराठ्यांनी पायाखाली घातलेला प्रदेश .
  • २ मराठा साम्राज्य इ. स. १७५८…
  • ३ पानिपतच्या छावणीचा व लढाईचा नकाशा. 
  • ४ मराठा साम्राज्य (१७९५)…
  • ५ भरतपूरच्या प्रसिद्ध वेढ्याचा नकाशा….. 

Please follow and like us:
Pin Share

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड (भाग २) १७०७ ते १८१८”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.