संक्षिप्त प्रस्तावना
विषयावरील प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांची माहिती अभ्यासुंसाठी देत आहे. महाराष्ट्रारात इंग्रजी सत्ता आल्यानंतर म्हणजे १८१८ पासून १८८५ पर्यंत ठिकठिकाणी सशस्त्र लढे झाले. त्यांत १८५७ चा लढा सर्वांत मोठा होता. त्या अगोदर खानदेशातील भिल्ल, पुणेसाताऱ्याकडील रामोशी यांच्या ७/८ वर्षे सतत चाललेल्या लढ्यांनी इंग्रजांना त्रस्त केले. कित्तुरचे बंड, सावंतवाडी, कोल्हापूर येथील गडकऱ्यांचे लढे हेही सशस्त्र होते. ब्रिटीशांनी हेही लढे वेळीच निपटून काढले. १८५७ साली कोल्हापूर, सातारा, मुंबई, नागपूर, खानदेश, नाशिक, औरंगाबाद, जमखिंडी, सुरपूर या ठिकाणी सशस्त्र लढे झाले. तेथील एतद्देशिय सैनिकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध हे सशस्त्र लढे केले. ह्या लढ्यांच्या इतिहासाची साधने शोधून प्रसिद्ध करण्यासाठी त्यावेळचे केंद्रिय शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या आध्यक्षतेखाली इतिहास तज्ञांची एक समिती नेमली होती. त्या समितीकडे १८५७ च्या इतिहासाच्या लेखणाचे काम सोपविण्यात आले, तसेच केंद्रशासनाने मुबंई, मध्येप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब इत्यादी सर्व राज्यांना राज्यस्तरीय इतिहास समित्या नेमण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रत्येक राज्याने इतिहास समित्या नेमल्या. त्यावेळच्या मुंबई सरकारने जी इतिहास समिती नेमली होती त्या समितीने मुंबई दप्तरखान्यातील ह्या विषयावरील कागदपत्रे तपासून “सोर्स मटिरियल फॉर द हिस्टरी ऑफ फ्रीडम मोव्हमेंट इन इंडिया”नावाचा १८१८ ते १८८५ या कालखंडातील अप्रसिद्ध कागदपत्रांचा खंड प्रसिद्ध केला. ही सर्व कागदपत्रे पूर्वी कॉन्फीडेन्सीयल म्हणजे गुप्त होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनाने त्यांची गुप्तता काढून टाकली. या रेकॉर्डमधून सरकारी दप्तरखान्यातील हस्तलिखित ग्रंथ विशेषतः पोलिटिकल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूम्स तसेच पुणे येथील दप्तरखान्यातील पत्रव्यव्हार ही निरनिराळ्या वेळच्या लढेाची माहिती पुरवितात. नागपूर लढ्याच्या माहितीसाठी श्री. या. मा. काळे यांचा नागपूर प्रांताचा इतिहास व वऱ्हाड प्रांताचा इतिहास तसेच नागपूर रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्स् भाग ३ हे उपयोगी आहेत. इनाम कमिशन स्थापून इंग्रज सरकारने इनामदारास कसे लुबाडले याची माहिती “मुंबई इलाख्यातील इनाम कमिशन खात्यातील गैर इन्साफ”या सन १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत मिळते. लोकहितवादींचे लेखसंग्रहही या बाबतीत खूप माहिती देतात.
महाराष्ट्रातील व्यापर धंदे इंग्रजांनी कसे नष्ट केले या संबंधीची माहिती पुणे येथील डेक्कन कमिशनर्स रेकॉर्डस्, सिलेक्शन ऑफ पेपर्स फ्रॉम द रेकॉर्डस ऑफ इंडिया हाऊस, व्हॉ. ३, ४, १८३१- ३२ चे पार्लमेंटरी पेपर्स चॅप्लीन व एल् फिन्स्टनचे रिपोटर्स, मुजुमदारकृत पेशवाईनंतरचा पुण्याचा इतिहास इत्यादी प्रसिद्ध अप्रसिद्ध साधने देतात.
भिल्लांनी १८१८ ते १८३१ पर्यंत सशस्त्र उठाव करून ब्रिटीशांना हैराण केले होते. कित्तूरच्या उठावाची माहिती १८२४ ते १८३० या कालखंडातील पोलिटिकल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूमस् देतात. रामोजी पुणे- सातारा जिल्याह्यातील रामोशांनी १८२४ ते १८३१ पर्यंत इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करून इंग्रजांस जेरीस आणले. रामोशांच्या बंडातील प्रमुख उमाजी नाईक यास ज्या कॅ्टन मॅकिन्टॉशने पकडले त्याने रामोशांचा इतिहास इंग्रजीमध्ये लिहून ठेवलेला आहे. तसेच त्या त्या वर्षीच्या पॉलिटिकल डिपार्टमेंटच्या व्हॉल्यूममध्ये या रामोशांच्या ठिकठिकाणच्या उठावांची माहिती सापडते. सावंतवाडी व कोल्हापूर येथील गडकऱ्यांनी केलेल्या उठावांची माहिती त्या त्या वर्षीच्या पोलिटिकल डिपार्टमेंटच्या व्हॉल्यूममध्ये तसेच कोल्हापूर व पुणे येथील दप्तरखान्यात सापडते. १८५७ मध्ये महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी एतद्देशीय सैनिकांनी जे सहस्त्र उठाव केले त्याची माहिती मुंबई दप्तरखान्यातील पोलिटिकल डिपार्टमेंट व्हॉल्यूममध्ये सापडते.
१८५७ च्या अयशस्वी उठावानंतर महाराष्ट्रात दोन दशके सर्वत्र सामसुम झाल्यासारखे वटले. पण दुष्काळ आणि साथीचे रोग यांनी थेमान घातल्यामुळे वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शुर रामोशी सहकारी यांनी १८७९ मध्ये सशस्र उठाव केला. वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. त्यांना १८८० च्या सुरूवातीस एडन येथे दीर्घमृदतीची सजा भोगण्यासाठी पाठण्यात आले. तेथेच हा विरपुरुष १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यूच्या स्वाधीन झाला.
डॉ. वि. गो. खोबरेकर
Digital Book