• -100% शिवकाल (१६३० ते १७०७)

    महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग १ (शिवकाल)

    0

    शिवकाल (इ. स. १६३०—१७०७)

    सिहावलोकन

    येथपर्यंत शिवशाही संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचे कथन उपलब्ध माहितीच्या आधाराने साधेल तेवढे सुसंगत केले आहे.

    शहाजी महाराज अभूतपूर्व प्रयोग आणि असामान्य कर्तृत्व करून परक्यांचे राज्य टिकविण्यासाठी झटले व नंतर स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या बापाच्या पराक्रमाच्या कथा आपल्या मातोश्रीकडून ऐकून बाल शिवरायांनी ठरविले की आपण आपले स्वतःचे राज्य उभार. ह्या विचारास वडील शहाजी महाराज, मातोश्री जिजाबाई, आणि इतर हितचिंतकांनी उचळून धरले. त्यावेळी शहाजी महाराज वडीलपुत्र संभाजीराजे यांसह बंगलोरास होते.

    त्याकरिता शहाजी महाराजांनी संभाजीराजे व शिवरायास दोन वर्षे बंगलोरात प्रशिक्षण देऊन त्यांना स्वराज्य स्थापण्यासाठी प्रखर ध्येयवादी बनविले. पुण्यास गेल्यावर बारा मावळातील लोकांच्या सुख-दुःखाशी समरस होऊन त्यांची मैत्री संपादन करणे व वतनदारांचा बंदोबस्त करणे ही दोन कामे शहाजी महाराजांनी शिवरायास सुचविली होती. 

    शिवरायांच्या बालपणी इस्लामी परधर्मीयांचे राज्य महाराष्ट्रात सर्वत्र होते. त्यावेळी हिंदू प्रजा सर्वार्थाने परदास्यात पिचत होती. हिंदूना बाटवून त्यांना इस्लाम धर्माची दीक्षा देणे, त्यांची मंदिरे, मूर्ती वगैरे श्रद्धास्थाने उद्‌ध्वस्त करणे, हिंदू स्रियांचे अपहरण इत्यादी अनेक अत्याचारांना मुस्लिम राज्यात हिंदू प्रजा तोंड देत होती. हे श्रिवरायांनी लहानपणी पाहिले आणि स्वजनांचे स्वतंत्र राज्य स्थापावयाचे ठरविले. त्याकरिता त्यांनी नियोजनपूर्वक साहसे केली. जीवन मरणाचे लढे दिले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपणांस राज्याभिषेक करवून घेतला. परदास्यात पिळल्या जाणाऱ्या विस्कळीत अशा हिंदू समाजाची जमेल तेवढी एर्कोजूट करण्याचे महाराजांनी आपले धोरण ठरविले.

    “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे” असे महाराज तत्कालीन देशपांडे व वतनदार वीर यांना आपल्या स्वराज्यसिद्धीच्या संकल्पनेत सामील करून घेण्यासाठी सांगत असत. यावरून त्यांच्या संकल्पनेस ईश्वराचे अधिष्ठान होते. इ. स. १६४६ त शिवरायांनी जी मुद्रा पत्रावर केली ती स्वतःच्या राज्याभिषेकानंतरही चाळू ठेवली होती. “प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते!” म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढणारी आणि विश्वाने वंदिलेली असून विश्वकल्याणासाठीच तिचे अस्तित्व आहे, ही मुद्रा त्यांनी संस्कृत भाषेत केली.

    शिवरायांनी परकीय राज्यकर्त्यांचे धार्मिक आणि राजकीय आक्रमण थांबून धरण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा एकच रामबाण तोडगा आहे, अज्ञी शिकवण तत्कालीन महाराष्ट्रीयांस दिली व स्वराज्याची स्थापना केली.

    स्वराज्य संपादनाचे काम चाळू असता महाराजांनी स्वराज्यातील ठिकठिकाणच्या साधूसंतांच्या भेटी घेतल्या. तसेच अनेक प्रसंगी मंदिरांना व मठांना मुद्दाम भेटी दिल्या. त्या काळात धार्मिक स्थाने ही जनतेची श्रद्धास्थाने होती. तिथल्या भेटीत तेथे जमणाऱ्या सामान्यजनांचा संपर्कही त्यांना साधता येत असे. शिवकालीन पत्रसारसंग्रहात ब्राह्मणास वर्षासने, अग्रदान, दान व इनाम दिल्याची अनेक पत्रे आहेत. त्यापैकी काही पत्रे सारांशरूपाने इथे दिली आहेत. इ. स. १६५३ मध्ये वेदमूर्ती गोपाळ भट यांनी मातोश्री जिजाबाईनना मंत्रोपदेश दिला. त्याबद्दल त्यांना वर्षासन व दानपत्र देण्यात आले. जुलै १६५३ त महाराजांनी सिद्धेश्वर भट यांना त्यांच्या अनुष्ठानबळे आपण राजाधिकारी जालो म्हणून वर्षासन दिले. १६५६ साली दोन काजींना तत्पूर्वी तुटलेली सनद चालू केली, हजरत पीराला इनामती शेतीची सनद दिली. तसेच १६७१ साली आळंदी येथील ज्ञानदेवाच्या मंदिरास इनाम दिले इ. स. १६७७ त चिंचवड देवस्थानातील अन्नखर्च भागविण्यासाठी वतन इनाम दिले. तिरुपती व चिपळूणजवळील परशुराम क्षेत्रास महाराजांनी वर्षासने दिली होती.

    Digital Book

    Original price was: ₹275.00.Current price is: ₹0.00.