क्रांतिसूक्ते: राजर्षी शाहू छत्रपतींच्या भाषणांचा टिपा-टिप्पणीसह चिकित्सक अभ्यास
राजर्षींच्या या ‘क्रांतिसूक्ता’ स आजच्या स्वातंत्र्योत्तर काळातील संदर्भ काय, याचाही विचार केला पाहिजे. महाराजांनी ज्यासाठी निर्धाराने झुंज दिली त्या गोष्टी आज पूर्णांशाने साकार झालेल्या नसल्या तरी त्या दिशेने फार मोठी प्रगती झाले आहे हे नाकारता येणार नाही. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामधील अनेक कर्तृत्वसंपन्न व्यक्ती राजकारणापासून शिक्षणापर्यंतच्या सर्व क्षेत्रांत आपल्या कृतीधृतीने चमकत आहेत. तथापि आपला समाज एकरस आणि एकजीव व्हावा हे राजर्षींचे स्वप्न तेवढ्या प्रमाणात साकार व्हायचे आहे. वाट मोठी आहे; हिमतीने चाल जरूर आहे. राजर्षी आहू छत्रपतीना अभिप्रेत असळेली सर्वकष क्रांती पूर्णत्वाने अजून व्हायची आहे. ‘श्रीशाय जनतात्मने’ ची प्रकर्षाने वानवा आहे. याचे तात्पर्य काय ते एवढेच आहे.
प्रस्तुत संग्रहात डॉ. भोसले यांनी राजर्षींची मराठी भाषणे तेवढी संगृहीत केली आहेत. राजर्षींच्या इंग्रजी भाषणांचा वेगळा संग्रह A Royal Philosopher Speaks या सुरेख मथळ्याने सिद्ध झाला आहे. प्रा. भोसले यांनी ‘क्रान्तिसूक्ते’ मध्ये राजर्षींची मराठी भाषणे विषयवार विभागणी करून ती छापली आहेत. डॉ. भोसले यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेले “टिपा आणि टिप्पणी’ हे सदर आजच्या अभ्यासकांना फार उपयुक्त होईल. त्यावरून डॉ. भोसले यांच्या संपादनकुडालतेची उत्तम साक्ष पटते. या कार्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राजर्षींच्या भाषणांचा असा हा सुंदर संग्रह सर्वांच्या आदरास पात्र होईल यात शंका नाही.
नागपूर वि. भि कोलते
Digital Book