प्रस्तुत ग्रंथ : मुंबईचा वृत्तांत
मुंबईविषयीचे दुसरे पुस्तक म्हणजे मुंबईचा वृत्तांत. हे ‘प्राचीन आणि अर्वाचीन वर्णनात्मक नकाशासह’ बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिले आणि निर्णयसागर छापखान्यात छापून १८८९ मध्ये प्रसिद्ध केले. आपल्यापुढील कार्याचा त्यांना योग्य अंदाज होता.
ज्या देशाचा किंवा प्रान्ताचा इतिहास लिहावयाचा, त्याची पूर्ण माहिती ग्रंथकारास असली पाहिजे; तेथींल अनेक वयोवृद्ध व अनुभवशीर अशा गृहस्थांचा त्याच्याशीं परिचय असला पाहिजे, व त्याने त्या कामी साधनीभूत अशा अनेक ग्रंथाचे अवलोकन केलें पाहिजे. इत्यादी साधनांपैकी आम्हापाशी एकही पुरें साधन नसतां आम्ही हें धाडसाचे आणि त्यांत मुंबईसारख्या वैभवशाली शहराचा वृत्तांत लिहिण्याचे काम हातीं कां घेतलें असा प्रश्न साहजिक उत्पन्न होईल. होय. प्रश्न अगदीं बरोबर आहे. आह्मींही पूर्ण जाणत आहों की, हें काम आमच्या शक्तीपलिकडे आहे हें खचीत. तरी पण, यथाशक्ती प्रयत्न करून जी अल्पस्वल्प माहिती मिळविली ती तशीच दाबून न ठेवितां लोकांपुढे आणावी, बरीवाईट कशी काय असेल तशी त्यांचे ते पाहून घेतील; आणि आमचे दोष आम्हांस दाखवितील.
असे लेखकद्वयीने प्रस्तावनेतच लिहून ठेवले आहे. ज्या पुस्तकांची त्यांनी मदत घेतली त्यात म्याक्लिन्स गाईड टु बॉम्बे, बुक ऑफ बॉम्बे, मुंबईचे वर्णन, राऊंड अबाऊट बॉम्बे; मुंबईनो बहार (भाग १ला), बिंबाख्यान इत्यादींचा समावेश आहे.
नोंद: ‘मुंबईचे वर्णन’ हे कै. माडगावकराचे पुस्तक मुंबई शहरातील मराठीतील पहिले पुस्तक होय.
मुंबईचा वृत्तांत या १८८९ साली प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचे विस्तृत प्रस्तावनेसह यथामूल पुनमुुद्रण
Digital Book