भाऊरावांच्या या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अंतिम हेतू पिळवणूकरहित एकसंध भारतीय समाजनिर्मितीचा होता. जातपात, भेद यांना थारा न मिळता सर्वांना मानव म्हणून शिक्षणाची व प्रगतीची संधी मिळाली पाहिजे. भारतास आत्मनिर्भर, संपन्न राष्ट्र बनविण्याचा तोच मार्ग आहे अज्ञी त्यांची ठाम समजूत होती. परंतु हे ध्येय साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आपल्या वसतिगृहातील कमकुवत स्तरातील मुलांना, जात-पात, जातिबहिष्कृतता, स्पृद्याकडून होणारी पिळवणूक व जुलूम यापासून निर्भय बनण्यास प्रथम शिकविले. भित्रा मनुष्य बंडखोर बनू शकत नाही. सांप्रदायिकता, जातपात, विवेकशून्य रूढी यांच्या भयापासून मुलांना मुक्त करून त्यांना मुक्त मानव बनविण्याचे भाऊरावांचे तत्त्वज्ञान होते; आणि हे काम परकीय सत्तेच्या भयापासून मुक्त करण्यास पूरक होते.
महाराष्ट्राच्या बाबतीत ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निरर्थक असल्याचे १९५३ साली त्यांनी पहिल्या महाराष्ट्र सामाजिक परिषदेत जाहीरपणे सांगितले होते. याची जाण भाऊरावांनी सन १९२२-२३ साली ‘कुऱ्हाड’ साप्ताहिकासाठी प्रबोधनाच्या पहिल्या प्रस्तावनेत स्पष्ट केली होती. सन १९५८ साली सातारच्या जिल्हा परिषदेने भाऊरावांना त्याच्या आजारपणाच्या स्थितीत मानपत्र देऊन सत्कार केला, त्यावेळी भाऊराव म्हणाले, ब्राह्मण समाजावर तरुणपणाच्या अविचारी अवस्थेत त्या काळास अनुसरून त्यांनी टीका केली; त्याबद्दल त्यांना पश्चाताप होतो आहे. आता हा वाद गाडून टाकला पाहिजे.” आंतरजातीय विवाह हा वाद मोडण्यास पूरक आहे अशी त्यांची धारणा असल्याने अश्या लग्नसमारंभास भाऊराव स्वतः हजर राहून वधूवरांना आक्रीर्वाद देत. आचार्य अत्र्यांच्या विवाहास ते हजर होते. कारण अत्र्यांचा तो विवाह आंतरजातीय होता.
Digital Book