ही तर रणरागिणी प्रजा वत्सल राणी
ज्या समाज रचनेत कोणतीही उन्नतीची साधने स्रियांना उपलब्ध नसताना, त्याकाळी या महान कर्तृत्व शालिनीने “पति’ बरोबर “सति” न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला!! ही प्रजा वत्सल राणी जनमानसाच्या डोळ्यातील पाणी पुसणारी खरी लोकमंगल माता झाली!! संपूर्ण भारतात त्यांचे नांव अत्यंत श्रद्धेने गौरवले गेले आहे. अत्यंत समृद्ध अशा राज्याची स्वामीनी असूनही आपली सर्व संपत्ती लोककल्याणार्थ खर्च केली. मंदिरे आणि तीर्थस्थाने यांना संरक्षण दिले. भारतीय शिल्प, कला, साहित्य आणि संस्कृती यांची अमोल सेवा केली. भारताच्या राज्य प्रशासनात त्यांच्या कार्याचे स्थान अढळ आहे. सर्व स्वकीयांना इंग्रज फिरंग्या विरुद्ध एकत्र होण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांनी पुढील संकट ओळखले होते – अशी दूरदृष्टी – अशी प्रजा वत्सल समदहृष्टी आणि कर्तृत्व सृष्टी – असलेल्या अहिल्या देवीचे या महान लोकमातेचे चरित्राचे वाचक वर्ग उत्साहाने स्वागत करतील अज्ञी आशा आहे.