गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या चिंतनामधून महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू आणि वैशिष्ट्यांबद्दल आपणांस माहिती मिळते. हा एक वेगळा आणि मनस्वी अनुभव आहे. रवीन्द्रनाथांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांकडून महात्मा गांधींसारख्या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल व्यक्त झालेले चिंतन हा भारतीय साहित्यसृष्टीचा अमोल ठेवा आहे. मंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी तो पुन्हा एकदा मराठी वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे.
रवीन्द्रनाथांसारख्या रसिक कविवर्याने महात्मा गांधींवर बंगालीत जे लिहीले आहे, ते मराठीत प्रथमच प्रकाशित करण्याचा हा सुयोग. प्रा. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे संस्कृत, पाली, तिबेटी व बंगाली या भाषेवरील प्रभुत्व सर्वश्रुत आहे. त्यांनी करुन दिलेल्या ह्या भाषांतराचे ऋण न फिटणारे आहे.
मधु मंगेश कर्णिक,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.