• -100% बालगंधर्व

    एक होता गंधर्व

    0

    एक होता गंधर्व

    – निवेदन – 

    “एक होता गँधर्व”ही आहे बालगंधर्वाची जीवनकथा. 

    नागपूरचे डॉ. राम म्हैसाळकर यांनी लिहिलेली .

    जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली.

    मधमाशांच्या मधानं लदलदलेल्या पोळाप्रमाणं.

    बालगंधर्वाच्या आयुष्यातले चढउतार शब्दबद्ध करणारी.

    बालगंधर्वाचा आयुष्यपट उलगडून दाखविता दाखविता तत्कालीन कालपट उलगडून दाखविणारी.

    या कालपटातला संगीताच्या क्षेत्रातला वैभवकाळ चित्रीत करणारी.

    मराठी नाट्याच्या व संगीताच्या रसिकांना अनमोल खजिना उपलब्ध करून देणारी.

    भीज पाऊस मनोहर आहे असं नुसतं म्हणायचं नसतं.

    या भीजपावसात मनसोक्त भिजायचं असतं.

    चला, येताय ना भिजायला.

    रा. रं. बोराडे,  अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य साहित्य आणिसंस्कृती मंडळ 

    दिनांक : २०-९-२००१

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
  • -100% नामदेव गाथा

    नामदेव गाथा

    0

    श्रीभक्‍त शिरोमणी संत नामदेव महाराजांची भक्‍तिज्ञाननिष्ठा आणि अपूर्व व्यक्तिमत्त्व

    महाराष्ट्रीय संतमंडळींत श्री नामदेव महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांची श्रीविठ्ठलेशावरील भक्‍ती निस्सीम व पराकोटीची होती, हे महाराष्ट्रांत सर्वश्रुत आहे. श्रीज्ञानराज माउलींनी महाराष्ट्रांत भागवत धर्माचा अर्थात वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि वारकरी भक्‍तिमार्गाला जे तत्त्वज्ञानाचे भक्‍कम अधिष्ठान दिले त्या संप्रदायाचा प्रचार व प्रसार श्रीनामदेव महाराजांनी येथे धडाडीने केला, हे सर्वांना ठाउकी आहे; पण हा प्रसार त्यांनी केवळ या महाराष्ट्रापुरता सीमित केला नाहीं ; तर तो उत्तर भारतांतही केला. श्रीविठ्ठलाला सोडून पंढरपुराबाहेर तीर्थयात्रेलाही जाण्यास तयार नसलेल्या श्रीविठ्ठलाच्या एकनिष्ठ भक्ताने गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश अशा अनेक प्रांतांतील शहरांत व खेड्यांत भागवत धर्माची पताका फडकावली ; एवढेच नव्हे तर आपल्या उत्तर आयुष्यांत ‘पंजाब’ ही आपली कर्मभूमी ‘ व दीड तपाहून अधिक काळ तेथे राहून, त्या प्रांतांत व आसमंतातील प्रदेशांत भागवत धर्माच्या “भक्‍ति-ज्ञानाची गंगा” नेऊन परकीय स्वाऱ्या व आक्रमणांनीं होरपळून निघालेल्या जनतेला  “अमृत-संजीवनी” दिली, तेथील जनतेत नवचैतन्य ओतले आणि स्वधर्म रक्षणाकरिता सिद्ध राहण्याची केवढी व कशी तयारी केली, याची महाराष्ट्रांत घ्यावी तेवढी दखल अद्यापिही घेतली नाहीं. पंढरीच्या वाळवंटांतील विठ्ठल नामाचा गजर आणि भागवत धर्माच्या “ भक्ति-ज्ञाना ” चे रहस्य श्रीनामदेव महाराजांनीं उत्तरेतही कसे गाजविले, हे कळून येते ; पण याचा उद्घोष महाराष्ट्रांत जितका व्हावा तितका अद्यापि झालेला नाहीं. ती माहिती व श्रीनामदेव महाराजांचे संपूर्ण ‘व्यक्तिमत्त्व’ व कार्य ‘ आपल्यास येथे थोडक्यात पाहावयाचे आहे.

    श्रीपुंडलिक रायांनीं श्रीविठ्ठलाला विटेवर उभे केले; त्या दैवताचा संप्रदाय व वारी श्रीज्ञानदेव महाराज व श्रीनामदेव महाराज यांच्या उदयापूर्वी सुमारे दोनशे-तीनशे वर्षे तरी असावी असे इतिहास संशोधकांचे मत आहे. त्यांच्यापूर्वी श्रीमदाधशंकराचार्य यांनी एक “ श्री पांडुरंगाष्टक ” लिहिले आहे; ते सर्वजन प्रसिद्ध आहे. त्याचेळी आजच्या संप्रदायाची शान, मान व प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी महानुभाव व लिंगायत पंथही आपल्या संप्रदायाचा प्रचार करीत होते. ते दोन्हीही पंथ अवैदिक असल्याने व वैदिक तत्त्वज्ञानाची त्यांना बैठक नसल्याने शिवाय महानुभाव पंथांत त्यांच्या लिपीची दुर्बोधता व विचाराची गुप्तता असल्याने जनमानसावर त्यांची छाप पडत नसे. हेमाद्री, रोप देवासारखी पंडित मंडळी संस्कृत धर्मग्रंथावर संस्कृत भाषेतच टीका करीत अगर ग्रंथरचना करीत ; ह्यामुळें प्राकृत जनांना त्याचा काही उपयोग नव्हता. आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारा व जनमानसांत चैतन्याचा संचार करणारा असा जोमदार पंथ उदयास आला नव्हता; ही उणीव भरून काढणारा “भागवत धर्माच्या भक्ति-ज्ञानाचा दीप श्रीसंत ज्ञानदेव आणि श्रीसंत नामदेव यांनी उजळला आणि जनतेला अंधारातून प्रकाशात-ज्ञान प्रकाशात आणिले.” 

    Original price was: ₹420.00.Current price is: ₹0.00.
  • -100% साने गुरुजी

    सेनानी साने गुरुजी

    0

    कोकणातला निसर्ग आणि खानदेशची माती व माणसे यांच्यावर गुरुजींनी निरतिशय प्रेम केले.

    अंतरीच्या उमाळ्याने गुरुजींनी लेखणीचा वापर केला त्याच उमाळ्याने त्यांनी आपली वाणीही वापरली. लेखणी आणि वाणी ही त्यांना त्यांच्या कार्यसिद्धीसाठी लाभलेली अमोघ अशी वरदानेच होती. ‘हा माणूस आपले जीवन, आपली सुखदुःखे, आपल्याच भाषेत, आपल्यापाशी तादात्म्य पावून अपरंपार सहानुभूतीने रंगवतो आहे’ असेच त्यांना भावले.

    याच उमाळ्याने शिक्षणाच्या क्षेत्रातही गुरुजी वावरले. ‘गुरुजी’ हे बिरुद त्यांच्याइतके महाराष्ट्रात अन्य कुणीही सार्थ केलेले नाही. तसे अंमळनेरच्या शाळेत श्रिक्षक म्हणून ते पाच-सहा वर्षेच होते. पण शाळेच्या चिमण्या जगाचा निरोप घेऊन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतल्यावरसुद्धा त्यांनी आपली शिक्षकाची भूमिका कधी सोडली नव्हती. समाजशिक्षणाचे कार्य अनेक अंगांनी ते सतत करीतच राहिले आणि महाराष्ट्राचे गुरुजी बनले.

    साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड हा श्रद्धाशील समर्पणवृत्तीच्या प्रेमळ अशा आर्त भक्ताचाच होता. त्यांनी मानवावर आणि मानवेतर सुष्टीवरही अपार प्रेम केले. प्रेमधर्माचे ते यात्रिकच होते. ‘खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे’ ह्या तर्‍हेच्या प्रेमधर्माची पताका त्यांनी आयुष्यभर फडकवत ठेवली. गुरुजींनी आपल्या वागणुकीतून, शिकवणुकीतून सर्वत्र प्रेमधर्माची शिकवण दिली. प्रेमाच्या फडाचे ते फडकरीच होते. प्रेमाच्या दिडीचे ते दिडीकरच होते.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.