• -100% रामजोशी

    लोककवी शाहीर रामजोशी

    0

    रामजोशी म्हणजे परस्पर विरोधी प्रवृत्तींचा मनोज्ञ संगम. 

    असा संगम फारच थोड्या लोकांच्या ठायी झालेला दिसतो. त्यांची डफावर दणकट थाप देणारी बोटे तितक्‍याच नजाकतीने वीणेच्या ताराही छेडीत असत. झाहीर आणि कीर्तनकार, व्युत्पन्नता आणि पाचकळपणा, गंभीरता आणि पोरकटपणा, भोगलोलुपता आणि त्याग, श्रृंगार आणि वैराग्य या सार्‍या गोष्टी रामजोशींच्या व्यक्तीमत्वात एकवटलेल्या दिसतात. पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य यांना जोडणारा रामजोशी हा महत्त्वाचा दुवा आहे.

    जगण्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगावा या वृत्तीने रामजोशींनी आयुष्याकडे पाहिले.  शृंगारकविता जितक्या तन्मयतेने त्यांनी लिहिली तज्ञाच उत्कटतेने उपदेशपर कविताही निर्माण केली. मराठी भाषेत रचना करतानाच त्यांच्या लेखणीने संस्कृतभाषेचा प्रदेशही पाहिला.  संस्कृत, मराठी,  कानडी, हिंदी भाषेचा वापर करून लावणी रचण्याचे चातुर्य त्यांनी दाखविले.  शीघ्रकवित्व आणि समयसूचकता हे दोन गुण त्यांच्याजवळ होते. मोरोपंतावर त्यांचे जितके प्रेम होते तितकेच घोंडीवर देखील होते.

    गिरीचा व्यंकटेश त्यांना जितका प्रिय होता. तितकाच बार्शीचा भगवंतदेखील प्रिय होता. पंढरीचा पांडुरंग त्यांचा प्रेमविषय होता. तशीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीवरही त्यांचे प्रेम होते. शिवशक्तीची उपासनाही कमीअधिक प्रमाणात त्यांनी केलीच होती. आणि तरीही इतक्या परस्परविरोधी प्रवृत्तींचा संगम ज्यांच्या व्यक्तीमत्वात होता, त्या कविरायांची कविता ही अस्सल मराठमोळी कविता आहे. हे लक्षणीय आहे.

    Digital Book

    Original price was: ₹150.00.Current price is: ₹0.00.