एकशे पंचवीस वर्षापूर्वी आपल्याकडे इंग्रजांचा अंमल होता. आजच्या जळगाव-धुळे जिल्ह्यांस त्या काळात खानदेश म्हणत. खानदेझ्ञाला लागून वरच्या बाजूने सातपुडा डोंगराची रांग आहे. याला लागून होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाड हे भाग होते. खानदेश, होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाडची हद्द जळगाव जिल्ह्यातील पालजवळ मिळत होती. त्या भागात तंट्या भिल्लाचे गाव होते. माउंटअबूपासून सुरू होणारा विध्य, सातपुडा आणि बस्तरपर्यंतच्या डोंगराळ भागात आदिवासींची मोठी वस्ती आहे. यातच भिल्लांची मोठी संख्या आहे.
मराठेझाहीचा १८१८ साली अस्त झाला. परंतु त्या काळात सातपुडातील बहादुर भिल्लांनी अनेक वर्षे गनिमी काव्यानं इंग्रजांशी झुंज दिली. सातपुडा, सातमाळा, अजिंठ्याच्या डोंगरांतील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजांशी प्रखर लढा दिला. ह्यात सातमाळातील भागोजी नाईक, सातपुडातील कजरसिंग नाईक, भिमा नाईक आणि तंट्या भिल्लाचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही सोनेरी पाने आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाप्रमाणेच या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहासही महत्त्वाचा आहे. बलाढ्य ब्रिटिझञ सत्तेला अकरा वर्ष सळो की पळो करणारा तंट्या भिल्ल हा
ज्या काळात होळकर, निजाम, झिंदे अन् इतर संस्थानिक ब्रिटिझ सत्तेची हुजरेगिरी करण्यात मशगुल होते, त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता. अकरा वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. त्याची एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील एक सोनेरी पान आहे.
Digital Book