पुस्तके का वाचावी?

पुस्तके वाचणे ही एक अमुल्य आणि समृद्ध  करणारी गोष्ट आहे जी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.

काळ कितीही बदलला तरीही ‘वाचन’ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे..

मग ते पोथी असो,पुस्तक असो वृत्तपत्र असो की मासिक असो..

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥

ज्ञानी माणसाचा सर्वत्र उदो उदो होतो आणि ज्ञान मिळवायचं असेल तर वाचन, मनन, चिंतन हवंच.

अश्या वाचनामुळे आपण विचार करू लागतो, स्वत:ला दुसऱ्या माणसाच्या जागी ठेऊन त्याच्या भाव-भावनांचा विचार करण्याची सवयही वाचनामुळे लागते. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे दुसऱ्यांची चरित्रे, आत्मचरित्रे वाचून आपले जीवन अनुभव संपन्न होते.

सारासार विचार क्षमता वृधिंगत होते.

अभिमन्यु ने आईच्या गर्भात चक्रव्युह शिकला होता हे आपण महाभारतातुन शिकलेच

वीर अभिमन्यु कक्षा 4 हिंदी कलरव चैप्टर 7 | Primary ka Master Guide for ... 

लहान मुलांना गोष्टी सांगता सांगता वाचुन दाखवायला सुरुवात केली की त्यांच्यात देखील वाचनाची आवड निर्माण होते …. वाचनाची सवय जेवढी लहानपणापासून लागेल तेवढी समज, आकलन क्षमता वाढण्यास मदत होते आणि व्यक्तिमत्व घडायला लागते. मुलं तीन-चार वर्षांची असल्यापासून अक्षरं-शब्द यांची जुळवाजुळव करायला लागतात. याच वयात असंख्य नवीन गोष्टी शिकता येतात. मुलांचं जसं वाचन वाढतं तसा शब्दांचा साठा वाढत जातो. त्याचमुळे चार लोकांशी मुलं बिनधास्त बोलू शकतात! खरंतर वाचनामुळे मुलांसह सर्वांचाच सर्वांगीण विकास होतो.. आत्मविश्वास येतो.. म्हणून विशेषत: मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे.

लहान मुलं ही अनुकरणशील असतात, जे बघतात तसंच वागतात. आई बाबांनी स्वत: मुलांना छोटी-छोटी पुस्तकं वाचायला, चित्र बघायला, त्यातुन आशय समजुन घ्यायला जाणीव करून द्यायला हवी. 

आपण वाचयला लागलो की मुलं ही वाचतात हे साहजिक आहे!

क्वचित प्रसंगी एखादं पुस्तकही आपल्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी पुरेसं असतं. अगदी सामान्य बुद्धिमत्तेचा माणूसही वाचनाच्या जोरावर ज्ञान आणि प्रेरणा मिळवून असामान्यत्व प्राप्त करू शकतो.  अशी अनेक उदाहरणे आपल्याला सहज आढळतील. 

हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली आणि लिहिलेली ‘सार्थ भगवद्गीता’ आजही आपल्याला जीवनाचे सार सांगते. आर्य चाणक्यांची नीतिसूत्रे आजही मार्गदर्शक ठरतात. हे प्राचीन ग्रंथ आजही मार्गदर्शक म्हणून जगभरात अनुकरले जातात आणि आपणही या सद्ग्रंथांकडुन सातत्याने मार्गदर्शन घेऊ शकतो.

ज्ञान समृद्धी: पुस्तके वाचण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यात असलेल्या मोठ्या प्रमाणात ज्ञान. पुस्तके अनोख्या विश्वाची कवाडे असतात, विविध विषय, संस्कृती आणि वेळ-काळाची सखोल संगती, ज्ञान देतात. आपल्याला इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान किंवा कल्पनाविश्वामध्ये स्वारस्य असो, ह्यासाठी एकतरी पुस्तक आहे जे आपल्या ज्ञानतृष्णा शांत करू शकते. 

साकल्याने विचार: अवांतर वाचन साकल्याने विचार करायला शिकविते. विद्यार्थ्यांनी का, कसे, कश्यासाठी, असे प्रश्न विचारणे, निष्कर्ष काढणे आणि साहित्याचे मूल्यांकन करणे हे शिकण्यास मदत करते. ही कौशल्ये शैक्षणिक यशासाठी आणि विविध समस्यांना, प्रश्नांना समजुन घेण्यासाठी, सोडवण्यासाठी महत्वाची आहेत.

विस्तृत वाचन, प्रभावी शब्दसंपदा : अवांतर वाचन विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वृद्धिंगत करते, जेणे कारणे शैक्षणिक संदर्भ समजून घेता येतात आणि आयुष्यात अन्यक्षेत्रांमध्ये प्रभावी संवाद साधता येतो.

वाचनाने  साकल्याने आकलन: अवांतर वाचक विद्यार्थी, आवडलेल्या साहित्याविषयी सक्रिय सहभागी होण्यास उस्तुक असतात. अवांतर वाचनाने एखाद्या विषयाचे बहुआयामी आकलन होते, त्याविषयी पाया पक्का होत जातो.

नोंदी काढण्याचे कौशल्य: अवांतर वाचक विद्यार्थ्यांना प्रभावी नोंदी-घेण्याचे तंत्र अवगत होते, जे वाचनातुन, व्याख्यानांमधून आकलनासाठी आणि उकलण्यासाठी बहोपयोगी आहे. 

व्यक्तिमत्व विकास: अवांतर वाचन चिकाटी, स्वयं-शिस्त आणि दृढनिश्चय यासारखी यक्तिमत्व विकासास चालना देऊ शकेल अशी बहुमोल कौशल्ये शिकविते.

शिकण्याची मानसिकता: अवांतर वाचन नवनवीन संकल्पना शिकण्याची उत्सुतकता वाढवते, विद्यार्थ्यांना स्वयंशिक्षणाची आणि स्व-सुधारणेची प्रेरणा देते

महाविद्यालयीन आणि आयुष्यातील  यशस्वीता: अश्या अवांतर वाचनाने घडत जाणारे विद्यार्थी उच्च शिक्षणात, व्यवहारी आयुष्यात सर्वाधीक यशस्वी ठरतात.  

Knowledge From Books Stock Illustration - Download Image Now - iStock

मातृभाषा का?

जो विद्यार्थ्यांच्या त्याच्या मातृभाषेवर उत्तम पकड मिळवितो, प्रभुत्व मिळवितो;  तो विद्यार्थीच मातृभाषा टाळुन इंग्रजी भाषेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत इंग्रजी भाषेवर देखील प्राविण्य मिळवितो. कालांतराने दोन्ही भाषांमधील विस्तृत वाचन, प्रभावी शब्दसंग्रह ह्या बाबी सखोल ज्ञानासाठी आकलनासाठी आवश्यक पायाभारणी करतात.

संदर्भ. Bridges, L. (2014). The Joy and Power of Reading: A Summary of Research and Expert Opinion. New York: Scholastic. 

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

1 Comment

  1. मस्त , छान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *