पुस्तकांचं Online गाव: पुस्तकांसाठी Online multivendor Marketplace

पुस्तकांचं असेही एक गाव असावं की, जिथे नजर जाईल तिथपर्यंत पुस्तकंच पुस्तकं आणि अगणित साहित्यीक  खजिना सापडेल? आम्ही असेच एक Online गाव नगर वसवीत आहोत “पुस्तकांसाठी Online multivendor Marketplace” च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात स्वागत आहे! येथे, आपण पुस्तकांच्या अथांग सागरात, साहित्य विश्वात विश्वासाने डुबकी घ्यावी, इथे कणाकणात साहित्य सुगंध आढळेल. आपण पुस्तक संग्राहक असाल, हौशी वाचक असाल किंवा लेखक असाल, हे आपलंच स्वप्न आहे जे सत्यात उतरले आहे.

पुस्तकांचे Online गाव हे प्रत्येक पुस्तकप्रेमीचे स्वप्न

कल्पना करा: तुम्ही घरी आरामात मस्त पैकी चहा, कॉफी पित आहात अन बरोबर पुस्तकांचा Online अमर्याद खाजिना धुंढाळत आहात. वेगवेगळे विषयांची पुस्तके समजुन घेत आहात. प्रस्तावना, परीक्षणे वाचत आहात. निवडक परिच्छेद, अन्य वाचकांचे मत वाचत आहात, लेखकांची विषयी जाणुन घेत आहात, पुरस्कारांची माहिती घेत आहात, लेखनामागची लेखकाची मनोभुमिका समजुन घेत आहात….

पुस्तकांसाठी Online multivendor Marketplace  ही संकल्पना वास्तवात आणायाचे टिंब ने (Timb.in) ठरविले. Timb.in भारतातील लेखक, प्रकाशक, वाचक, पुस्तकविक्रेते, ग्रंथालये अश्या असंख्य पुस्तकप्रेमींना एकत्र आणत आहेत.

सहजसाध्य पुस्तक निवड

एखाद्या विशिष्ट पुस्तक असो, दुर्मिळ असो, प्रथम आवृत्ति असो, पुरातन किंवा नवीन असो, सर्वोत्तम असो, आता केवळ काही क्लिक्स मध्ये आपण सहज पुस्तक शोधू शकतो. आपण विशिष्‍ट लेखनशैलीचे आस्वादक असाल, इतिहासाचे चोखंदळ वाचक, अभ्यासक किंवा ज्ञानसाधक असाल, Timb.in आपल्याला साहित्यकोशाची सुविधा देत आहे. हे एका अवाढव्य ग्रंथालयासारखेच आहे, जिथे आपण वाचकही असु अन साहित्यसंग्रहकही .

पुस्तक निवडण्याची कला

पुस्तकांसाठी Online multivendor Marketplace वापरणे, त्यावर शोध घेणे म्हणजे आनंदच. प्रत्येक नवा शोध म्हणजे साहित्यिक साहसच आहे. पुस्तकांवरील पुस्तक शोध असेल, साहित्यावरील दुर्मिळ ग्रंथ लेख शोध असु दे  किंवा अनुवादीत, वैश्विक मंत्रमुग्ध करणारी कादंबरी असेल, त्याविषयी माहितीने आपलं संमोहन होईल. टिंब (Timb.in) आपल्या चिकित्सकवृत्तीला, चोखंदळपणाला समजुन मान देत, आपण घेत असलेल्या ज्ञात-अज्ञात साहित्याविश्वाचा धुंढाळा घेण्यासाठी निरंतर सुविद्य होत आहे.

साहित्यातील गाळीव रत्ने शोधताना

जुन्या पूराण्या पुस्तकांच्या दुकानात धुळीने भरलेल्या कोपऱ्यात एखादे सुंदर पुस्तक शोधण्याचा एक वेगळाच आनंद असतो!

पुस्तकांसाठी Timb.in वर पुस्तकांची जणु एक खाण आहे. स्थानिक पुस्तकविक्रेत्यांच्या सह त्याही पलीकडेही, अज्ञात, दुर्मिळ,आवडत्या लेखकाच्या स्वाक्षरीसह अश्या पुस्तकं शोधणे, त्याविषयीची चर्चा,आपणाकडे असलेली एखादी दुर्मिळ प्रतीचे प्रदर्शन करू शकता. संग्राहक आणि चोखंदळ वाचकांसाठी टिंब (Timb.in) एक आश्रयस्थान आहे

पुस्तकमित्रांशी संवाद, संपर्क साधणं  

एखाद्या उत्तम कादंबरीविषयी अन्य वाचकांशी, चाहत्यांशी आपण चर्चा करतो, संवाद साधतो त्यावेळेस त्याकादंबरीचा बहुपेडी परिणाम समजुन येतो, त्यातुन निर्मळ आनंदही मिळतो. टिंब (Timb.in) यासाठी सहज संवाद सुविधा उपलब्ध करून देते तुम्ही इतर वाचकांसह अगदी लेखकांची सहज संपर्क करू शकाल तेही टिंबवरुनच अजून एक विशाल पुस्तक नगरी सारखेच आहे जिथे प्रत्येक जण पुस्तकांची भाषा बोलतो.

साहित्याची नवी पायवाट एका क्लिकवर – खुल जा सिम सिम …..

टिंब (Timb.in) च्या डिजिटल विश्वातुन, आपल्यासाठी पुस्तकं विकत घ्या!  आपण एखादे पुस्तक विकत घेतो तेव्हा आपण त्या पुस्तकाचे जणु एक पात्र, नायक बनतो. तुमच्या वेगळ्या प्रवासासाठी नवा मित्र मिळवा, नवे पुस्तक घेऊन!

मुखपृष्ठांच्या पलीकडे: एक सखोल विचार

मुखपृष्ठांच्या पलीकडे, पुस्तकांच्या पानांच्या पलीकडे एक सखोल विचार असतो आपल्याला त्यात हरवायला आवडत असेल तर आपल्या निश्चितच स्वागत आहे. टिंब (Timb.in) हे जणू आपले वैयक्तिक ग्रंथसंकलन आहे यात आपली आवड निवड आणि आपला चोखंदळपणा जपला जातो म्हणजेच सूची, पुनरावलोकने, आपले आवडते लेखक, लेख wish lists जपले जाते. त्याच बरोबर टिंब (Timb.in) देखील निरंतर सुविद्य होत आहे

उत्तमोत्तम सवलती

एखादं आवडणारं पुस्तक स्वस्तात मिळालं की तो आनंद अवर्णनीय असतो! टिंब (Timb.in) वर आणि स्पर्धात्मक किमती असतात अनेक सवलती असतात जाहिराती असतात आणि अनेकदा पुस्तकसंच देखील असतात, विशेष आवृत्ती असतात या सगळ्यांचा ढांडोळा घेण्यासाठी टिंब उत्तम वेबसाईट आहे.

नवनवीन पुस्तकांचा शोध

टिंब (Timb.in) ही केवळ संग्राह्य पुस्तकांसाठीच नाही तर उत्तमोत्तम आणि नवनवीन पुस्तकांसाठी प्रकाशनांकडुन थेट मिळणाऱ्या सवलतींसाठी एक योग्य वेबसाईट आहे.आपल्या आवडत्या लेखकाचे एखाद्या पुस्तकाची मागणी आपण प्रकाशन पूर्व नोंदवू शकता, संधी मिळाल्यास उदयोन्मुख लेखकांच्या कामात सहाय्य करण्यासाठी देखील संपर्क करू शकता.  टिंब (Timb.in) एक साहित्यिक नवनिर्मितीचे अनोखं  केंद्र आहे जिथे पुस्तकांविषयी, लेखकांविषयी नेहमीच नाविन्यपूर्ण चर्चा आणि नाविन्यपूर्ण माहिती उपलब्ध असेल. ज्यायोगे पुस्तक जगतातील चर्चेविषयी आपण देखील नेहमीच आघाडी वरती असू.

ऑनलाईन ग्रंथभांडार चालू करणे

आपले स्वतःचे ग्रंथभांडार ज्यावेळेस आपण टिंब (Timb.in) वर चालू करून कालांतराने आपल्या नवनव्या संकलनासह आपले ग्रंथभांडार स्वतःची ओळख निर्माण करेल. आपली साहित्याविषयक गुणग्राहकता, विक्रेता म्हणुन असलेली चोखंदळवृत्ती आपली एक वेगळी ओळख निर्माण करेल. आपण स्वतः नुसतेच विक्रेता नसून एक गुणग्राहक आहात उत्तमोत्तम पुस्तकांविषयी जागरुक आहात. आपल्या ग्रंथव्यवहाराकरिता आम्ही आपल्याला सहाय्य करायला कटिबद्ध आहोत.

टिंब (Timb.in) म्हणजे पुस्तकांसाठी ऑनलाइन मल्टीव्हेंडर मार्केटप्लेस हे आधुनिक काळातील नवकल्पना आहे, सकल साहित्यासाठी काम हेच त्यांचे गमक आहे. टिंब (Timb.in) वर तुम्ही स्वतःच ग्रंथ भांडार चालू करू शकाल, वाचक म्हणून समविचारी वाचकांसोबत संवाद साधू शकाल साहित्याच्या या रोमांचित करणाऱ्या मोठ्या महानगरी सहज फेर फटका मारु शकाल.

टिंब च्या साहित्याचळवळीत सहभागी होऊया, आपले स्वागत आहे.

– विक्रम शांतीलाल शेठ 

Please follow and like us:
Pin Share

Sharing is caring!

1 Comment

  1. साहित्यीक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *