Description
निवेदन
“महाराष्ट्राचे शिल्पकार” या योजनेतील हे एक पुस्तक. माणसाला जगायला अन्नाप्रमाणे शिक्षण देखील आव्यक ठरते. स्वतःची सर्वप्रकारे प्रगती करून जीवन आनंदमय करायचे तर ज्ञान व परिस्थितीचे भान असायलाच हवे. ते शिक्षणविना लाभणे कठीणच.
अशा ह्या मौलिक शिक्षणाचा प्रसार सर्वसामान्य जनतेत होणे आवश्यक. हे जाणून ह्या महाराष्ट्रात प्रथम महात्मा जोतीराव फुले ह्यांनी हे शिक्षण प्रसाराचे व्रत स्वीकारले. त्यांचा वसा पुढे महाराष्ट्रात अनेकांनी घेतला व चालवला. त्यांच्यापैकी कर्मवीर भाऊराव पाटील हे एक अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ. त्यांनी “रयत शिक्षण संस्था” स्थापन करून शिक्षण प्रसाराचे सर्वदूर जाळे विणिले.
त्यांच्या काळची परिस्थिती व त्या पार्श्वभूमीवरील त्यांचे कर्तृत्व समाजाला कळावे व कर्मवीर भाऊराव पाटलांचे चरित्र आणि चारित्र्य आदर्श म्हणून लोकांना अवलोकिता यावे या उद्देशाने हे लिहून घेतलेले आहे.
लेखक डॉ. रा. अ. कडियाळ, ह्यांचे मंडळ आभारी आहे. ह्या पुस्तकाचे मुद्रक व मंडळाचे सचिव श्री. चंद्रकांत वडे ह्यांनी हे पुस्तक लवकर व उत्तम प्रकारे निघावे म्हणून बरेच श्रम घेतले आहेत. मंडळ त्यांचेही आभारी आहे.
रसिक ह्याचे स्वागत करतील ही मनीषा.
डॉ. मधुकर आष्टीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
दिनांक १३ फेब्रुवारी, १९९८
अनुक्रमणिका
- प्रकरण पहिले: अव्वल इंग्रजीतील महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती..
- प्रकरण दुसरे: जन्म, बाळपण, परंपरा व संस्कार
- प्रकरण तिसरे: भाऊरावांचे शिक्षण व जडणघडण
- प्रकरण चौथे: उपजीविकेच्या शोधात.
- प्रकरण पाचवे: संस्थानी पोलिसांच्या विळख्यात
- प्रकरण सहावे: स्वदेशी उद्योजकांच्या सहवासात
- प्रकरण सातवे: अक्रोडाची फळे.
- प्रकरण आठवे: रयत शिक्षण संस्थेची घटना व प्राथमिक कार्य…
- प्रकरण नववे: शिक्षणातील प्रयोग…
- प्रकरण दहावे: भाऊरावांचे शैक्षणिक तत्वज्ञान …
- प्रकरण अकरावे: रयत शिक्षण संस्थेची अर्थव्यवस्था
- प्रकरण बारावे: भाऊरावांच्या कर्तृत्वाचा सन्मान..
- प्रकरण तेरावे: भाऊरावांचे कुटुंबीय…
- संदर्भ ग्रंथसूची…
प्रकरण अकरावे: रयत शिक्षण संस्थेची अर्थव्यवस्था
सन १९५९-६० सालात म्हणजे भाऊरावांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र शासनाने आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या मुलांना फीमाफीची सवलत जाहीर केली. तसेच याच सुमारास विद्यापीठ अनुदान मंडळाकडून महाविद्यालयांना इमारत, शास्त्रीय साहित्य व शिक्षकांच्या पगारासाठी ८०% अनुदाने मिळू लागल्याने, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनीही त्याग करण्याच्या युगाचा अंत झाला. त्याबरोबर शिक्षणक्षेत्रातील मानवतावादी दृष्टिकोनाचा ऱ्हासही झाला. सारांश, भाऊरावांच्या मृत्यूनंतर स्वावलंबन व आत्मनिर्भरतेच्या तत्त्वास तिलांजली मिळाली. याचा दृश्य परिणाम म्हणजे सर्व काही शासनाने करावे ही दृष्टी जनतेत आली. जनतेच्या ठिकाणची दातृत्वाची भावना लोपली. १००% अनुदानाच्या सवलतीचा महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात गैरवापर होऊ लागला. शिक्षणदान त्यागाचे न राहता भोगाचे क्षेत्र बनत गेले.
डॉ. रामचंद्र अनंत कडियाळ
( कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यावर इंग्रजीत पीएच. डी. चा प्रबंध, १९८०, १९८७ साली सदर ग्रंथ प्रकाशित, सन १९८३ प्राथनिक शिक्षकांच्या उद्बोधनासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुस्तिका लिहिली. प्रकाशक इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे. )
canadian online pharmacy –
Excellent article. I am dealing with a few of these issues as well..